रिद्धीने हवाहवाई बनत श्रीदेवींना दिली श्रद्धांजली
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2018 10:19 IST2018-03-20T04:49:39+5:302018-03-20T10:19:39+5:30
लहानपणीपासून मित्र असलेल्या दोन भिन्न व्यक्तिमत्त्वांच्या आयुष्याचा एक आगळावेगळा प्रवास &TV च्या सिद्धिविनायकमध्ये दाखविण्यात येत आहे. या मालिकेची कथा ...
.jpg)
रिद्धीने हवाहवाई बनत श्रीदेवींना दिली श्रद्धांजली
ल ानपणीपासून मित्र असलेल्या दोन भिन्न व्यक्तिमत्त्वांच्या आयुष्याचा एक आगळावेगळा प्रवास &TV च्या सिद्धिविनायकमध्ये दाखविण्यात येत आहे. या मालिकेची कथा आता अशा वळणावर येऊन पोहोचली आहे जिथे सर्व रहस्य उलगडणार असून सगळ्यांना सत्य कळणार आहे. येणाऱ्या भागात रिद्धी अर्थात फरनाझ शेट्टी एका वेगळ्या अवतारात दिसणार असून सिद्धीच्या मृत्यूमागे नक्की कोण आहे, या शोधाच्या ती अगदी जवळ येऊन पोचली आहे आणि हे रहस्य उलगडायला मदत होत असलेला असा कोणताही पुरावा इतर कोणाला कळावा असे तिला अजिबात वाटत नाही.
सिद्धिविनायकच्या येणाऱ्या भागामध्ये, सिद्धीच्या मृत्यूकरिता विनायक कारणीभूत नसून रिद्धीचा शंकरवर संशय असल्याचे प्रेक्षकांना पाहायला मिळेल. गुंडा (भिमा) सह शंकर बोलत असल्याचे ऐकून ती त्याचा पाठलाग करते आणि डान्सबारमध्ये पोचते. त्याच्याकडून माहिती काढून घेण्यासाठी ती बारमधील डान्सरची वेशभूषा घेऊन प्रसिद्ध गाणे हवाहवाई या गाण्यावर
नृत्य करते. गुंडाच्या विश्वात डोकावून पाहण्यासाठी जगप्रसिद्ध नर्तिकेचे सोंग घेऊन श्रीदेवीने जसा नृत्याचा वापर केला होता, रिद्धीही अगदी हेच करणार आहे.
या कथेसंदर्भात सांगताना फरनाझ शेट्टीने (रिद्धी) सांगितले, “मला हे कथेचे वळण खूपच आवडले हे कारण एका वेगळ्या अवतारात मला माझे प्रेक्षक बघू शकतील. तुम्हारी सुलूमधील हवाहवाई या गाण्यावर मी नाचले आहे. याची तयारी करत असताना मी मूळ हवाहवाई गाणे माझ्या डोक्यात ठेवले होते. मिस्टर इंडिया आणि चालबाज बघितल्यापासूनच मी श्रीदेवींची चाहती बनले. हा परफॉर्न्स साकारून अशा उत्कृष्ट अभिनेत्रीला श्रद्धांजली वाहण्याची माझी इच्छा आहे. श्रीदेवी मॅम ज्या गाण्यासाठी ओळखल्या जातात त्या गाण्यावर नाचण्याची संधी मला मिळाली हे मी माझे भाग्य समजते.”