'ये रिश्ता क्या...' चा नैतिक या अभिनेत्रीला करतोय डेट?लवकरच अडकणार विवाहबंधनात!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 2, 2018 14:36 IST2018-03-02T09:06:21+5:302018-03-02T14:36:21+5:30

छोट्या पडद्यावरील 'ये रिश्ता क्या कहलाता है' मालिकेत नैतिकची भूमिका साकारणारा विशाल सिंह सध्या त्याच्या खाजगी आयुष्यामुळे चर्चेत आहे. ...

'Is relation ... ... is the moral or actress' date? | 'ये रिश्ता क्या...' चा नैतिक या अभिनेत्रीला करतोय डेट?लवकरच अडकणार विवाहबंधनात!

'ये रिश्ता क्या...' चा नैतिक या अभिनेत्रीला करतोय डेट?लवकरच अडकणार विवाहबंधनात!

ट्या पडद्यावरील 'ये रिश्ता क्या कहलाता है' मालिकेत नैतिकची भूमिका साकारणारा विशाल सिंह सध्या त्याच्या खाजगी आयुष्यामुळे चर्चेत आहे. तो सध्या खूप बाहेर तिच्या बरोब वेळ घालवताना दिसतो. तिच्या बरोबरच संपूर्ण वेळ घालवत असल्याचे त्याचे फोटोंवरून कळते. विशाल 'लौट आओ त्रिशा' ची अभिनेत्री अदिताला डेट करत असल्याच्या चर्चा रंगत आहेत.दोघांचे इंस्टाग्रामवर अनेक रोमँटिक फोटोज आहेत.दोघांचाही फोटोंमधला अंदाजही निराळा आहे.त्यांचे दोघांचे फोटो सोशल मीडियावर खूप व्हायरलही होत आहेत.दोघांमधील हे प्रेमाचं नातं दिवसेंदिवस आणखी घट्ट बनत चाललं आहे. निव्वळ मैत्री या शब्दांपलीकडे या दोघांच्या नात्याकडे पाहिलं जात आहे.तसेच विशाल आणि अदिता ब-याच वर्षापासून एकमेकांना डेट करत आहेत. त्यामुळे ते लवकरच लग्न करणार अशाही चर्चा आहेत.एकमेकांना वेळ देता यावा,निवांत क्षण घालवता यावा यासाठीही काही दिवसांपुर्वीच दोघेही मालदीव्हमध्ये व्हॅकेशन एन्जॉय करताना दिसले होते.या हॉलिडेचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते.ये रिश्ता क्या कहलाता है मालिकेपूर्वी विशाल 'देख भाई देख' या टीव्ही शोमध्ये दिसला होता.'अस्तित्व' आणि 'परवरिश' मध्ये प्रमुख भूमिकेत दिसला होता.

cnxoldfiles/a>नायरा आणि कार्तिक यांची रिल लव्ह स्टोरी आता रियल लाइफमध्येही सुरु झाल्याचं बोललं जात आहे. नायराची भूमिका साकारणारी अभिनेत्री शिवांगी जोशी आणि कार्तिकची भूमिका साकारणारा मोहसिन खान यांच्यात सध्या रियल लाइफ लव्ह स्टोरी रंगत असल्याचं पाहायला मिळत आहे. दोघांच्या प्रेमाच्या गोष्टी चांगल्याच रंगल्या असताना याच मालिकेतील आणखी एक जोडीची प्रेमाच्या नात्यात बुडाल्याचं बोललं जात आहे. ये रिश्ता क्या कहेलाता है या मालिकेत नक्ष ही भूमिका साकारणारा अभिनेता रिषी देव आणि मोहेना सिंग यांच्यात प्रेमाचं नातं जडू लागलं आहे. दोघंही एकमेकांना पसंत करत असून बराच काळ एकत्र घालवत आहेत. दोघांमधील हे प्रेमाचं नातं दिवसेंदिवस आणखी घट्ट बनत चाललं आहे. निव्वळ मैत्री या शब्दांपलीकडे या दोघांच्या नात्याकडे पाहिलं जात आहे. रिषी आणि मोहेना यांच्यातील या प्रेमाच्या नात्याची आणि दोघंही एकत्र बराच काळ घालवत असल्याची कल्पना मालिकेच्या सेटवरही प्रत्येकाला कल्पना आलीच आहे. एकमेकांसाठी खूप स्पेशल असल्याची कबूली दोघांनीही दिली आहे.

Web Title: 'Is relation ... ... is the moral or actress' date?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.