​स्मृती कारलाने या कारणाने छोट्या पडद्यावर किसिंगला दिला नकार

By ऑनलाइन लोकमत | Published: January 12, 2018 11:35 AM2018-01-12T11:35:42+5:302018-01-12T17:05:42+5:30

दिल संभल जा जरा ही मालिका सध्या प्रेक्षकांना चांगलीच आवडत आहे. या मालिकेतील सगळ्याच व्यक्तिरेखा प्रेक्षकांनी डोक्यावर घेतल्या आहेत. ...

For this reason, the refusal of the Kisanga to the small screen due to the memory carnely | ​स्मृती कारलाने या कारणाने छोट्या पडद्यावर किसिंगला दिला नकार

​स्मृती कारलाने या कारणाने छोट्या पडद्यावर किसिंगला दिला नकार

googlenewsNext
ल संभल जा जरा ही मालिका सध्या प्रेक्षकांना चांगलीच आवडत आहे. या मालिकेतील सगळ्याच व्यक्तिरेखा प्रेक्षकांनी डोक्यावर घेतल्या आहेत. या मालिकेत संजय कपूर, निकी अनेजा, स्मृती कालरा, असीम गुलाटी मुख्य भूमिका साकारत आहेत. या सगळ्यांचा अभिनय प्रेक्षकांना चांगलाच भावत आहे. स्मृती कालराने आजवर तिच्या कारकिर्दीत अनेक भूमिका साकारल्या आहेत. सुरवीन गुग्ल या मालिकेतील तिच्या भूमिकेचे चांगलेच कौतुक झाले होते. तिने दिल संभल जा जरा या मालिकेत इंटिमेट सीन दिले होते. त्यामुळे ती एक बोल्ड अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. पण तिने याच मालिकेत आता किसिंग दृश्य देण्यास नकार दिला आहे. 
दिल संभल जा या मालिकेत सध्या स्मृती आहाना ही भूमिका साकारत आहे तर संजय कपूर आपल्याला अनंत या भूमिकेत पाहायला मिळत आहे. या मालिकेत नुकतेच तिने संजय कपूरसोबत तिने एक इंटिमेट दृश्य दिले होते. पण तिने याच मालिकेत एका अभिनेत्याला किस करण्यास मनाई केली आहे. टेलिचक्कर या वेबसाईटने दिलेल्या बातमीनुसार दिल संभल जा जरा या मालिकेत स्मृतीने एक किसिंग सीन द्यावा असे या मालिकेच्या टीमचे म्हणणे होते. या मालिकेत असीम गुलाटी रेहनाची भूमिका साकारत आहे. या मालिकेत त्यांच्या दोघांवर एक किसिंग सीन चित्रीत करण्याचे मालिकेच्या टीमचे म्हणणे होते. पण स्मृतीने या गोष्टीसाठी चक्क नकार दिल्याने या मालिकेच्या टीमला चांगलाच धक्का बसला. छोट्या पडद्यावर किसिंग दृश्य देण्यासाठी ती तयार नसल्याचे तिचे म्हणणे आहे. याविषयी स्मृती सांगते, किसिंग दृश्य न देणेच योग्य असल्याचे मला वाटते. मोठ्या पडद्यावर किसिंगचे दृश्य देणे आणि छोट्या पडद्यावर किसिंगचे दृश्य देणे यामध्ये जमीन आस्मानचा फरक आहे. तुम्ही छोट्या पडद्यावर किसिंग केले तर त्याविषयी लगेचच चर्चा होते. प्रसारमाध्यमांमध्ये देखील याविषयी लिहिले जाते. माझ्याविषयी असे कोणीही लिहिलेले मला आवडणार नाही आणि त्यामुळे मला छोट्या पडद्यावर किसिंगचे दृश्य द्यायचे नव्हते आणि त्याविषयी मी माझ्या मालिकेच्या निर्मात्यांना सांगितले आणि त्यांनी देखील माझ्या या मताचा आदर राखला. 

Also Read : ‘दिल संभल जा जरा’मध्ये संजय कपूरने घातला मनीष मल्होत्राने डिझाईन केलेला सूट!

Web Title: For this reason, the refusal of the Kisanga to the small screen due to the memory carnely

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.