या कारणामुळे' बालिका वधू' फेम सिद्धार्थ शुक्लाला सोडावी लागणार 'दिल से दिल तक' मालिका
By ऑनलाइन लोकमत | Published: March 9, 2017 08:44 AM2017-03-09T08:44:10+5:302017-03-09T14:14:10+5:30
बालिका वधू फेम सिध्दार्थ शुक्लाला याच मालिकेने लोकप्रियता मिळवून दिली. त्यानंतर तो दिल से दिल तक या मालिकेत झळकतोय. ...
ब लिका वधू फेम सिध्दार्थ शुक्लाला याच मालिकेने लोकप्रियता मिळवून दिली. त्यानंतर तो दिल से दिल तक या मालिकेत झळकतोय. टीव्ही मालिकासह काही सिनेमातही सिध्दार्थने काम केले आहे.'दिल से दिल तक' या मालिकेत त्याच्यासह रश्मी देसाई आणि जस्मिन भसीनदेखील प्रमुख भूमिकेत आहेत.सध्या 'दिल से दिल तक' या मालिकेलाही रसिकांकडून चांगली पसंती मिळत आहे.मात्र ही मालिकेला मिळाणारी रसिकांची पसंती ही फक्त आणि फक्त सिध्दार्थच्याच कामामुळे मिळत असल्याचे त्याचे म्हणणे आहे. त्यामुळे सध्या तो हवेत असून शूटिंग दरम्यानही त्याचे वागणे चांगले नसल्याचे कळतंय. सेटवर तो नेहमी लेट येतो त्यामुळे इतर कलाकारांनाही कधी कधी शूटिंगसाठी थांबावे लागते. त्याचे वाढलेले नखरे बघता मालिकेच्या टीमने सिध्दार्थला मालिका सोडण्यासाठी सांगतिले असल्याचे कळतंय.सिध्दार्थची वागणूक सेटवर चांगली नसते अशाच बातम्या तो बालिका वधू ही मालिका करत असतानाही येत होत्या.मात्र या सगळ्या बातम्या खोट्या असल्याचे त्याने म्हटले होते.बालिकावधूच्या सेटवर सगळ्यांना सतवत असे, कोणाशी चांगल्या प्रकारे वागत नसे अशाप्रकारच्या बातम्या कोणी पसरवल्या आहेत हे अद्याप तरी मला कळलेले नाही. माझ्यासाठी बालिकावधू ही मालिका खूप महत्त्वाची होती. कारण याच मालिकेतील शीव या व्यक्तिरेखेने मला खऱ्या अर्थाने ओळख मिळवून दिली. त्यामुळे या मालिकेच्या बाबतीत मी अशाप्रकारे वागणे शक्यच नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे मी सेटवर सगळ्यांना नाटकं केली असती तर कलर्स या वाहिनीने मला पुन्हा त्यांच्या कोणत्याही मालिकेत घेतले नसते. बालिकावधूनंतर खतरो के खिलाडी, इंडियाज गॉट टॅलेंट आणि आता दिल से दिल तक ही मालिका मी याच वाहिनीसोबत करत आहे.मी वाईट वागत असतो तर कलर्स या वाहिनीने मला पुन्हा पुन्हा त्यांच्या मालिकांमध्ये संधी दिली नसती."असे स्पष्टीकरण त्यावेळी त्याने दिले होते.