शक्ती अस्तित्व के एहसास की या मालिकेतील काम्या पंजाबीच्या भूमिकेला तृतीयपंथीयांची मिळतेय पसंती
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2017 17:35 IST2017-01-28T12:05:54+5:302017-01-28T17:35:54+5:30
काम्या पंजाबी सध्या शक्ती अस्तित्व के एहसास की या मालिकेत एक महत्त्वाची भूमिका साकारत आहे. या तिच्या भूमिकेला प्रेक्षकांची ...
शक्ती अस्तित्व के एहसास की या मालिकेतील काम्या पंजाबीच्या भूमिकेला तृतीयपंथीयांची मिळतेय पसंती
क म्या पंजाबी सध्या शक्ती अस्तित्व के एहसास की या मालिकेत एक महत्त्वाची भूमिका साकारत आहे. या तिच्या भूमिकेला प्रेक्षकांची चांगलीच पसंती मिळत आहे. या मालिकेलादेखील प्रेक्षकांनी डोक्यावर घेतले आहे. या मालिकेची कथा ही सध्याच्या मालिकांपेक्षा खूप वेगळी असल्याने प्रेक्षकांना ती चांगलीच भावत आहे. या मालिकेत रुबिना रुबिना दिलाइक तृतीयपंथीयाची भूमिका साकारत आहे. कोणत्याही अभिनेत्रीने मालिकेत तृतीयपंथीयाची भूमिका साकारण्याची ही पहिलीच वेळ आहे. या मालिकेत काम्या रुबिनाच्या सासूच्या भूमिकेत प्रेक्षकांना पाहायला मिळत आहे. रुबिना म्हणजेच सौम्यासोबत ती अतिशय वाईट वागते असे या मालिकेत दाखवण्यात आले आहे. त्यामुळे सध्या तृतीयपंथीय काम्याला भेटल्यानंतर ती सौम्याशी अशी का वागते याचा जाब तिला विचारत आहेत. याविषयी काम्या सांगते, "माझ्या या भूमिकेला प्रेक्षकांची चांगलीच पसंती मिळत आहे. त्यांनी माझी ही भूमिका स्वीकारली आहे याचा मला आनंद होत आहे. मी रस्त्यावरून जात असताना आजकाल अनेकवेळा तृतीयपंथी मला थांबवतात आणि माझ्याशी गप्पा मारतात. मी मालिकेत सौम्यासोबत अशी का वागते? तिला सतवणे आता तरी मी बंद केले पाहिजे असे ते मला सांगतात. या सगळ्या प्रतिक्रिया म्हणजे माझ्या कामाला मिळत असलेली पावतीच आहे. मला खऱ्या आयुष्यात एक लहान मुलगी आहे. या मालिकेत मी काम करायला लागल्यापासून तिच्या मनातदेखील तृतीयपंथीयांविषयी उत्सुकता निर्माण झाली आहे. तृतीयपंथी म्हणजे काय असे नुकतेच तिने मला विचारले होते. यावर तृतीयपंथी कोण असतात आणि समाजात त्यांना कशाप्रकारे वागणूक दिली जाते, त्यांना योग्य वागणूक देणे गरजेचे आहे या गोष्टी मी तिला समजवून सांगितल्या.