राम, सीता, लक्ष्मण की रावण... 'रामायण'मध्ये या कलाकारानं घेतलं होतं सर्वात जास्त मानधन, पाहा स्टारकास्टची फी

By ऑनलाइन लोकमत | Published: January 20, 2024 06:21 PM2024-01-20T18:21:21+5:302024-01-20T18:22:28+5:30

अयोध्येतील राम मंदिराच्या प्राण प्रतिष्ठा सोहळ्यापूर्वी रामानंद सागर यांचे 'रामायण' (Ramayana) पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. रामायणात रामाची भूमिका करणाऱ्या अरुण गोविल, सीतेची भूमिका करणाऱ्या दीपिका चिखलियांपासून ते लक्ष्मणाची भूमिका साकारणाऱ्या सुनील लाहिरींपर्यंत राम मंदिराच्या उद्घाटन सोहळ्याला आमंत्रित करण्यात आले आहे.

Ram, Sita, Lakshman or Ravana... This actor took the highest remuneration in 'Ramayana', see the starcast fees | राम, सीता, लक्ष्मण की रावण... 'रामायण'मध्ये या कलाकारानं घेतलं होतं सर्वात जास्त मानधन, पाहा स्टारकास्टची फी

राम, सीता, लक्ष्मण की रावण... 'रामायण'मध्ये या कलाकारानं घेतलं होतं सर्वात जास्त मानधन, पाहा स्टारकास्टची फी

अयोध्येतील राम मंदिराच्या प्राण प्रतिष्ठा सोहळ्यापूर्वी रामानंद सागर यांचे 'रामायण' (Ramayana) पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. रामायणात रामाची भूमिका करणाऱ्या अरुण गोविल, सीतेची भूमिका करणाऱ्या दीपिका चिखलियांपासून ते लक्ष्मणाची भूमिका साकारणाऱ्या सुनील लाहिरींपर्यंत राम मंदिराच्या उद्घाटन सोहळ्याला आमंत्रित करण्यात आले आहे. या पात्रांनी प्रेक्षकांच्या हृदयात एक विशेष स्थान निर्माण केले होते जे आजही कायम आहे. पण तुम्हाला माहीत आहे का, या कलाकारांनी या भूमिकांसाठी चांगलेच मानधन आकारली होते?

'रामायण'मधील अरुण गोविल आणि दीपिका चिखलिया यांच्या पात्रांनी लोकांना सर्वाधिक प्रभावित केले. भगवान रामाच्या भूमिकेत अरुण गोविल आणि देवी सीतेच्या भूमिकेत दीपिका चिखलिया यांनी प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले. सुनील लाहिरी यांनी लक्ष्मणाची भूमिका तर दारा सिंह यांनी हनुमानाची भूमिका साकारून लोकांच्या मनावर राज्य केले. सर्व स्टार्सना त्यांच्या कामासाठी मोठ्या प्रमाणात मोबदला दिला जात होता. पण त्यातील सर्वात महागडे अभिनेते म्हणजे रामाची भूमिका करणारे अरुण गोविल.

हा अभिनेता होता सर्वात महागडा!
डीएनएमध्ये प्रकाशित झालेल्या रिपोर्टनुसार, रामानंद सागर यांच्या 'रामायण'मध्ये रामाची भूमिका साकारणाऱ्या अरुण गोविल यांना सर्वाधिक फी देण्यात आली होती. 'रामायण' १९८७ साली प्रसारित झाले होते आणि त्यावेळीही अरुणला ४० लाख रुपये फी म्हणून देण्यात आली होती. बाकीच्या पात्रांना त्याच्यापेक्षा कमी मोबदला मिळाला होता, जरी ती फी देखील त्या वेळेनुसार खूप जास्त होती.

स्टारकास्टला मिळाली होती मोठी रक्कम
अरुण गोविल यांच्यानंतर सर्वाधिक मानधन घेणारे अभिनेते दारा सिंग होते. दारा यांनी 'रामायण'मध्ये भगवान हनुमानाची भूमिका साकारली होती. या पात्रासाठी त्यांना ३५ लाखांचा धनादेश देण्यात आला होता. यानंतर तिसरे महागडे अभिनेते अरविंद त्रिवेदी होते, ज्यांना रावणाच्या भूमिकेसाठी ३० लाख रुपये मानधन मिळाले होते. शोमध्ये लक्ष्मणची भूमिका करून मन जिंकणाऱ्या सुनील लाहिरी यांना २५ लाख रुपये फी देण्यात आली होती. तर मुख्य भूमिकेत सीता म्हणून उदयास आलेल्या सीतेला सर्वात कमी म्हणजे २० लाख रुपये देण्यात आले होते.

Web Title: Ram, Sita, Lakshman or Ravana... This actor took the highest remuneration in 'Ramayana', see the starcast fees

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.