राखी सावंत थिरकली टिप टिप बरसा पानीवर, नेटिझन्स म्हणाले, एन्टरटेन्मेंट क्वीन, पाहा हा व्हिडिओ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2021 17:29 IST2021-06-11T17:27:40+5:302021-06-11T17:29:18+5:30
राखी टिप टिप बरसा पाणी या गाण्यावर थिरकताना दिसली. तिचा हा अंदाज तिच्या चाहत्यांना प्रचंड आवडत आहे.

राखी सावंत थिरकली टिप टिप बरसा पानीवर, नेटिझन्स म्हणाले, एन्टरटेन्मेंट क्वीन, पाहा हा व्हिडिओ
राखी सावंतचा बिनधास्त अंदाज हा प्रेक्षकांना नेहमीच आवडतो. ती कधी मुंबईच्या रस्त्यांवर भाजी घेताना दिसते तर कधी कॉफी शॉपमध्ये. राखी सावंत कुठे काय करेल याचा नेम नाही. तिला नुकतेच मुंबईत पाहाण्यात आले. त्यावेळी ती कॅमेऱ्याला पाहाताच रवीना टंडनच्या प्रसिद्ध गाण्यावर थिरकली.
मुंबईत सध्या जोरदार पाऊस असून याच पावसात राखी टिप टिप बरसा पाणी या गाण्यावर थिरकताना दिसली. तिचा हा अंदाज तिच्या चाहत्यांना प्रचंड आवडत आहे. राखीचा हा व्हिडिओ विरल भयानी यांनी सोशल मीडियावर शेअर केला असून केवळ 21 तासांत 3 लाख 39 हजाराहून अधिक लोकांनी हा व्हिडिओ पाहिला आहे. हा व्हिडिओ पाहून राखीचे फॅन्स तिचे कौतुक करत आहेत. ती एन्टरटेन्मेंट क्वीन असल्याचे तिला कमेंटच्या माध्यमातून सांगत आहेत.
गेल्या काही दिवसांपासून पापाराझींसोबतचे राखीचे व्हिडीओ चर्चेत आहेत. गेल्या काही दिवसांपासून वजन खूप वाढल्याने ते घटवण्यासाठी राखी फिटनेस सेंटरमध्ये घाम गाळतेय. तिने काही दिवसांपूर्वी योगा करतानाचे काही व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केले होते. पण या व्हिडिओमुळे तिला सोशल मीडियावर चांगलेच ट्रोल करण्यात आले होते.