ये प्यार नहीं तो क्या है या मालिकेतील पलक जैनला तिचा सहकलाकार नमित खन्नाने दिली ही खास भेट

By ऑनलाइन लोकमत | Published: April 3, 2018 04:28 AM2018-04-03T04:28:54+5:302018-04-03T09:58:54+5:30

सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवरील ‘ये प्यार नहीं तो क्या है’ मालिकेत अनुष्का रेड्डीची भूमिका साकारणार्‍या पलक जैनला प्रेक्षकांकडून आणि मनोरंजन ...

Pyaar Jain, co-actor Namit Khanna has given this special gift to the film | ये प्यार नहीं तो क्या है या मालिकेतील पलक जैनला तिचा सहकलाकार नमित खन्नाने दिली ही खास भेट

ये प्यार नहीं तो क्या है या मालिकेतील पलक जैनला तिचा सहकलाकार नमित खन्नाने दिली ही खास भेट

googlenewsNext
नी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवरील ‘ये प्यार नहीं तो क्या है’ मालिकेत अनुष्का रेड्डीची भूमिका साकारणार्‍या पलक जैनला प्रेक्षकांकडून आणि मनोरंजन उद्योगातील इतर कलाकारांकडून खूप प्रशंसा मिळत आहे. ही मालिका सुरू होऊन काहीच दिवस झाले असले तरी या मालिकेला आणि या मालिकेतील व्यक्तिरेखांना प्रेक्षकांचे चांगलेच प्रेम मिळत आहे. या मालिकेद्वारे पलक जैनने छोट्या पडद्यावर पदार्पण केले आहे आणि आपली कामगिरी उत्कृष्ट व्हावी यासाठी ती प्रचंड मेहनत घेत आहे.
पलकच्या जैनच्या खऱ्या आयुष्यातील काही गोष्टींचा ‘ये प्यार नहीं तो क्या है’ या मालिकेतील कथानकात वापर करण्यात आला आहे. पलकला तिच्या खऱ्या आयुष्यात धुळीची अॅलर्जी आहे. त्यामुळे मालिकेत ती साकारत असलेल्या अनुष्का या व्यक्तिरेखेला देखील अशीच धुळीची अॅलर्जी असल्याचे दाखवण्यात आले आहे. मालिकेचा सेट दिल्लीत असला तरी तो दिल्ली शहरापासून खूप दूर असल्यामुळे पलकला बराच प्रवास करून जावे लागते. राजधानी दिल्लीतील वस्ती खूप वाढलेली असल्याने दूरपर्यंत आणि महामार्गांवरून प्रवास करणार्‍या प्रवाशांना खूप काळजी घ्यावी लागते. पलकला प्रदूषणाचा त्रास होऊ नये म्हणून तिचा सह-कलाकार नमित खन्नाने तिला एक मास्क दिला आहे. या मास्कमुळे सध्या धुळीपासून तिचे रक्षण होत आहे. याविषयी पलकला विचारले असता तिने या गोष्टीची पुष्टी करत सांगितले, “होय, मला धुळीची अॅलर्जी आहे आणि पडद्यावरील मी साकारत असलेल्या अनुष्का रेड्डी या व्यक्तिरेखेला देखील तशीच अॅलर्जी असल्याचे दाखवण्यात आले आहे. माझा सह-कलाकार नमित याने मला चित्रीकरण करत असताना एक मास्क भेट म्हणून दिला. त्याने माझ्यासाठी विचार केला हे माझ्यासाठी खूप महत्त्वाचे आहे आणि त्याची ही गोष्ट खूपच कौतुकास्पद आहे. मी रोज सेटवर येताना, प्रवास करताना तसेच सकाळी जॉगिंग किंवा सायक्लिंग करताना तो मास्क वापरते. दिल्लीतील प्रदूषणाचा स्तर दिवसेंदिवस वाढत चालला आहे आणि सर्वांच्याच आरोग्याला त्याने धोका निर्माण झाला आहे. माझ्या मास्कमुळे प्रदुषणापासून माझा बचाव होत आहे.”

Also Read : ये प्यार नहीं तो क्या है या मालिकेमुळे नमित खन्ना आणि अंकित राज या जुन्या मित्रांची झाली पुन्हा भेट

 

Web Title: Pyaar Jain, co-actor Namit Khanna has given this special gift to the film

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.