प्राण्यांविषयी आकर्षण तर सर्वांनाच असते. अन त्यातल्या त्यात वाघ हा तर सर्वांचाच लाडका प्राणी ...
सई-कोअलाचा झक्कास फोटो
/> प्राण्यांविषयी आकर्षण तर सर्वांनाच असते. अन त्यातल्या त्यात वाघ हा तर सर्वांचाच लाडका प्राणी त्याला जवळून पाहता यावे फोटो घेता यावा यासाठी सगळेच धडपडता. परंतू काही असे प्राणी आहेत ज्यांचे अॅट्रॅक्शन बºयाच जणांना असते. असेच अॅट्रॅक्शन सई ताम्हणकरला कोअला बद्दल वाटते. आता हा कोअला कोण असे जर वाटत असेल तर तो आॅस्ट्रेलियात आढळणारा एक प्राणी आहे. मोठ्या खारुताईसारखा दिसणारा हा कोअला सईचा फेव्हरेट अॅनीमल आहे असे तीच सांगते. सईला तिच्या या लाडक्या प्राण्याला पाहुन त्याच्यासोबत फोटो काढण्याचा मोह आवरता आला नाही. झाडावर चढलेला तो कोअला सईकडे पाहत असुन सई मात्र फोटोसाठी पाऊट करुन पोझ देण्यातच बिझी होती.