काला टीका या मालिकेत पराग त्यागीची एन्ट्री
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 26, 2017 15:58 IST2017-01-26T10:28:19+5:302017-01-26T15:58:19+5:30
ब्रह्मराक्षस या मालिकेत पराग त्यागीची ब्रह्मराक्षसही भूमिका प्रेक्षकांना प्रचंड आवडते. दरम्यानच्या काळात सरकार ३ या चित्रपटात काम करत असल्याने ...
.jpg)
काला टीका या मालिकेत पराग त्यागीची एन्ट्री
dir="auto" style="color: rgb(34, 34, 34); font-family: arial, sans-serif; font-size: small;">ब्रह्मराक्षस या मालिकेत पराग त्यागीचीब्रह्मराक्षसही भूमिका प्रेक्षकांना प्रचंड आवडते. दरम्यानच्या काळात सरकार ३ या चित्रपटात काम करत असल्याने त्याने मालिका सोडली होती. पण त्याची लोकप्रियता प्रचंड असल्याने मालिकेच्या निर्मात्यांना त्याला मालिकेत पुन्हा बोलवावे लागले.
पराग त्याची खलनायकाची भूमिका ब्रह्मराक्षस या मालिकेत अतिशय ताकदीने साकारत असल्याने आता झी टिव्ही वाहिनीवरीलच काला टीका या मालिकेत त्याची एन्ट्री होणार आहे. याही मालिकेत तो खलनायकाच्या भूमिकेत झळकणार आहे.
काला टीका ही मालिका लवकरच १४ वर्षांचा लीप घेणार असून लीप नंतर मालिकेत प्रेक्षकांना परागला पाहायला मिळणार आहे. या मालिकेत तो ठाकूर ही भूमिका साकारणार असून त्याला गावात प्रचंड मान असून लोक त्याचा शब्द प्रमाण मानतात असे दाखवले जाणार आहे.
समाजात असलेल्या अंधश्रद्धांवर हा कार्यक्रम भाष्य करतो. या मालिकेने वर्षभरापूर्वी देखील काही कालावधीचा लीप घेतला होता. त्यावेळी मालिकेत सिमरन परिंजा, फेनिल उमिगर आणि रोहन गंडोत्रा यांची एन्ट्री झाली होती.
पराग आज छोट्या पडद्यावरचा प्रसिद्ध खलनायक मानाला जातो. काला टीका या मालिकेत एन्ट्री करण्यासाठी सध्या तो खूप उत्सुक आहे तो सांगतो, एकाच वाहिनीवर दोन मालिका करायला मिळत आहेत याचा मला अधिक आनंद होत आहे. ब्रह्मराक्षस या मालिकेतील माझे काम लोकांना आवडत आहे आणि आता पुन्हा एकदा एक खलनायक म्हणूनच मी प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. काला टीका या मालिकेत काम करणे माझ्यासाठी आव्हानात्मक ठरणार आहे. कारण या मालिकेत मी साकारत असलेली ठाकूर ही भूमिका परागपेक्षा खूपच वेगळी आहे. दोन्ही मालिकांमध्ये मला एकमेकांपेक्षा पूर्ण वेगळ्या भूमिका साकारायला मिळत आहे याचा मला अधिक आनंद होत आहे. मी साकारत असलेला ठाकूर हा गावातील लोकांना खूप चांगला वाटतो. त्यामुळे लोक त्याला खूप मान देतात. पण गावात होत असलेल्या लोकांच्या अपहरण आणि त्यांना विकण्याच्या मागे या ठाकूरचाच हात आहे.