पंकित ठक्कर आणि प्राची ठक्कर घेणार घटस्फोट
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 6, 2017 15:28 IST2017-07-05T11:54:08+5:302017-07-06T15:28:24+5:30
पंकित ठक्कर आणि प्राची ठक्कर हे छोट्या पडद्यावरचे एक खूप क्यूट कपल मानले जात होते. पण त्यांच्या चाहत्यांसाठी एक ...

पंकित ठक्कर आणि प्राची ठक्कर घेणार घटस्फोट
प कित ठक्कर आणि प्राची ठक्कर हे छोट्या पडद्यावरचे एक खूप क्यूट कपल मानले जात होते. पण त्यांच्या चाहत्यांसाठी एक वाईट बातमी आहे. त्यांनी नुकतेच घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला आहे. पंकित आणि प्राची यांच्या लग्नाला जवळजवळ 17 वर्षं झाली असून त्यांना एक छोटा मुलगा देखील आहे. पण आता त्यांनी वेगळे व्हायचे ठरवले आहे. पंकितनेच ही बातमी मीडियाला दिली आहे.
प्राची आणि पंकित दोन वर्षांपासून वेगळे राहात असल्याचे म्हटले जात आहे. 2015पासूनच त्यांच्यात भांडणे व्हायला सुरुवात झाली होती. त्यानंतर त्यांनी घटस्फोट घ्यायचे ठरवले. घटस्फोटाचा मुलावर परिणाम होऊ नये यासाठी मुलाच्या भविष्याचा दोघांनी एकत्रित विचार करण्याचे ठरवले आहे.
पंकितने एका वर्तमानपत्राला दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे की, आम्ही विभक्त होत आहोत ही बातमी खरी आहे. आम्ही दोघे दोन वर्षांपासून वेगळे राहात आहोत. आम्ही दोघे आज एकत्र नाही आहोत याशिवाय मी अजून काहीही सांगू इच्छित नाहीये. आम्ही दोघे सहमतीने वेगळे व्हायचा निर्णय घेतला आहे. आमचा मुलगा हा आमची प्रायोरिटी असून त्याच्याकडे सगळे लक्ष देण्याचे आम्ही दोघांनी ठरवले आहे.
प्राची ठक्करने कसोटी जिंदगी की, हवन यांसारख्या मालिकांमध्ये काम केले आहे. प्राचीने अभिनेता पंकित ठक्करसोबत लग्न केल्यानंतर मालिकांमध्ये काम करणे बंद केले होते. त्यामुळे ती गेल्या अनेक वर्षांपासून अभिनयक्षेत्रापासून दूर होती. पण काही महिन्यांपूर्वी तिने नीले छत्रीवाले या मालिकेद्वारे कमबॅक केला होता. पंकितने दिल मिल गये, कभी सौतन कभी सहेली, बहू हमारी रजनिकांत यांसारख्या मालिकांमध्ये काम केले आहे.