omg ! बिग बॉसच्या अंतिम फेरीमध्ये मनू पंजाबीने सोडले बिग बॉसचे घर

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2017 12:41 IST2017-01-29T07:11:47+5:302017-01-29T12:41:47+5:30

सध्या बिग बॉस १०ची अंतिम फेरी रंगत असल्याचे पाहायला मिळत आहे. या अंतिम फेरीमध्ये बानी, लोपा, मनवीर आणि मनू ...

omg! Bigg Boss house left by Manu Punjabi in Bigg Boss final | omg ! बिग बॉसच्या अंतिम फेरीमध्ये मनू पंजाबीने सोडले बिग बॉसचे घर

omg ! बिग बॉसच्या अंतिम फेरीमध्ये मनू पंजाबीने सोडले बिग बॉसचे घर

्या बिग बॉस १०ची अंतिम फेरी रंगत असल्याचे पाहायला मिळत आहे. या अंतिम फेरीमध्ये बानी, लोपा, मनवीर आणि मनू यांपैकी विजेता कोण होणार याची उत्सुकता सर्व प्रेक्षकांना लागली आहे. मात्र मनू पंजाबीच्या चाहत्यांसाठी वाईट बातमी आहे. ऐन अंतिम फेरीत प्रेक्षकांचा लाडका बिग बॉसचा स्पर्धक मनू पंजाबीने बिग बॉसचे घर सोडले आहे.

      थोडे बिग बॉस या रियालिटी शोच्या भूतकाळात डोकावून पाहा. बिग बॉसची माजी स्पर्धक किश्वर मर्चंट आठवते का? किश्वरने टिकेट टू फिनाले टास्क दरम्यान सदर शो सोडण्याचा निर्णय घेतला होता. तिने त्यावेळी अंतिम फेरीत जाण्यापेक्षा १५ लाख घेऊन बिग बॉस हाउस सोडणे सोयीस्कर समजले होते. असेच काहीसे बिग बॉसच्या आताच्या पर्वातही घडले आहे. यंदा मनू पंजाबीने देखील असाच काहीसा किश्वरसारखा निर्णय घेतला आहे. त्याने १० लाख रुपये घेऊन बिग बॉसचे घर सोडण्याचा निर्णय घेतल्याचे कळत आहे. 
           
     बिग बॉसच्या १० व्या पवार्ची अंतिम फेरी आज होणार आहे. असे कळते की,  बिग बॉसने प्रत्येक पर्वाप्रमाणे यंदाच्या पर्वातही मनवीर गुर्जर, मनू पंजाबी, बानी आणि लोपामुद्रा राऊत या स्पर्धकांना १० लाखांची आॅफर दिली. बिग बॉसची ही आॅफर स्वीकारल्यास त्या स्पर्धकाला त्याच क्षणी बिग बॉसचे घर सोडावे लागते. ही आॅफर मनूने स्वीकारली असून त्याने घर सोडण्याने त्याच्या चाहत्यांना नक्कीच धक्का बसला असेल. या शोच्यामाध्यमातून मनू पंजाबीचा चाहतावर्ग खूपच वाढत असल्याचे पाहायला मिळत आहे. तसेच मनवीर, मोनालिसा आणि मनूच्या यारीने बिग बॉस १० हा रियालिटी शो गाजविला असे म्हणण्यास हरकत नाही. या तिघांच्या दोस्तीने ही प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले आहे. त्यामुळे मनू ऐन अंतिम फेरीत बिग बॉस १० च्या अंतिम फेरीतून बाहेर पडल्याने त्याचे चाहते नक्कीच नाराज झाले असणार हे खरं.

Web Title: omg! Bigg Boss house left by Manu Punjabi in Bigg Boss final

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.