आता नागिन फेम मौनी रॉयला साकारयचीय दबंग 'पोलिस' अधिका-याची भूमिका

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 27, 2017 17:58 IST2017-01-27T12:22:47+5:302017-01-27T17:58:55+5:30

'नागिन' मालिकेत आपल्या अंदाजाने रसिकांवर मोहिनी घालणारी मौनी रॉयला आता नागिन नाहीतर दबंग पोलीसाची भूमिका साकारायची इच्छा आहे.सध्या 'नागिन' ...

Now the role of the 'Police Officer' of the Nagin Fame Mouni Roy, Sakyachayya Dabang | आता नागिन फेम मौनी रॉयला साकारयचीय दबंग 'पोलिस' अधिका-याची भूमिका

आता नागिन फेम मौनी रॉयला साकारयचीय दबंग 'पोलिस' अधिका-याची भूमिका

'
;नागिन' मालिकेत आपल्या अंदाजाने रसिकांवर मोहिनी घालणारी मौनी रॉयला आता नागिन नाहीतर दबंग पोलीसाची भूमिका साकारायची इच्छा आहे.सध्या 'नागिन' बनत मौनी रॉय छोट्या पडद्यावर फन करताना दिसतेय.'नागिन'चा पहिला पर्वालाही रसिकांची भरघोस पसंती मिळाली होती. 'नागिन' या सिरीजला मिळणारा प्रतिसाद बघता 'नागिन 2' पर्व सुरू करण्यात आले. दुसरे पर्वही रसिकांची भरघोस पसंती मिळवत असून टीआरपी रेसमध्येही टॉप 10 शोच्या यादीत हा शो अव्वल आहे.या शोमुळे मौनी रॉयच्या भूमिकेचेही विशेष कौतुक होत असताना होत आहे. मात्र मौनीला आता वेगळ्या प्रकारची भूमिका साकारायची आहे.साचेपध्द कामातून आता मन उडत चालले असल्याचे तिने म्हटले आहे. एकाच प्रकारचे काम करत असताना कामात काहीच नाविन्य मिळत नाही.मी करत  असलेले कामातून आर्थिक समस्या सोडवल्या जातात मात्र आत्मिक समाधान मिळत नसल्याचे मौनीने म्हटले आहे. यापूर्वी मौनीने 'क्योंकी साँस भी कभी बहू थी','देवो के देव महादेव','शूssss...फिर कोई है(Season 3), 'दो सहेलीयाँ','कस्तुरी' या मालिकेत वेगवेगळ्या भूमिकेत झळकली होती.इतक्या विविध भूमिका रंगवल्यानंतर आता तिला एका दबंग पोलिस अधिका-याची भूमिका साकारायची इच्छा  असल्याचे तिने म्हटले आहे. 

Web Title: Now the role of the 'Police Officer' of the Nagin Fame Mouni Roy, Sakyachayya Dabang

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.