'येऊ कशी तशी मी नांदायला'मध्ये नवीन कलाकाराची एन्ट्री, जाणून घ्या कोण आहे हा व्यक्ती

By ऑनलाइन लोकमत | Published: July 3, 2021 05:58 PM2021-07-03T17:58:40+5:302021-07-03T17:59:28+5:30

येऊ कशी तशी मी नांदायला मालिकेत नवीन पात्राची एन्ट्री होणार आहे.

New artist's entry in 'Yeu Kashi Tashi Mi Nandayla', find out who this person is | 'येऊ कशी तशी मी नांदायला'मध्ये नवीन कलाकाराची एन्ट्री, जाणून घ्या कोण आहे हा व्यक्ती

'येऊ कशी तशी मी नांदायला'मध्ये नवीन कलाकाराची एन्ट्री, जाणून घ्या कोण आहे हा व्यक्ती

googlenewsNext

येऊ कशी तशी मी नांदायला मालिकेत आता स्वीटू आणि ओम यांच्या प्रेमाबद्दल त्यांच्या घराच्यांना माहित झाले आहे. ओमची आई शकू दोघांच्या लग्नाला तयार असली तरी स्वीटूची आई सरू हिचा मात्र विरोध आहे. या मालिकेत स्वीटू हे पात्र सर्वाना हवेहवेसे वाटते कारण ती सर्वाना सांभाळून घेते. या मालिकेत आता स्वीटू एका पार्लरमध्ये काम करताना पाहायला मिळते आहे. त्या पार्लरमधील मालकीण आता स्वीटूसाठी स्थळ शोधून आणतेय त्याच नव्या पात्राची आता एन्ट्री होणार आहे.

येऊ कशी तशी मी नांदायला मालिकेत स्वीटूला लग्नासाठी पाहायला येणाऱ्या नव्या पात्राच्या भूमिकेत अभिनेता मनमीत पेम दिसणार आहे. मनमीत पेम चित्रपट आणि मालिकेत पाहयला मिळाला आहे.

टाईमपास, व्हेंटिलेटर, फोटोकॉपी अशा अनेक चित्रपटांत तो झळकला आहे. तर प्रसाद ओक दिग्दर्शित कच्चा लिंबू चित्रपटात देखील त्याने काम केले आहे.या चित्रपटात त्याने साकारलेल्या गतीमंद मुलाची भूमिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली होती. 


तसेच मनमीत पेम डब्बा गुल या मालिकेत देखील झळकला होता. स्वीटू प्रमाणेच हे नवीन पात्र जाड असल्याने दोघे पाणीपुरी खायला जातानाच्या सीनमध्ये त्याच्यावर लोक हसून जोक मारतात त्यावेळी स्वीटू त्या लोकांना एखाद्याच्या शरीरावरुन त्याची टिंगल करू नये असा एक व्हिडिओ नुकताच प्रदर्शित करण्यात आला आहे.


येऊ कशी तशी मी नांदायला मालिकेच्या आधीच्या भागात ओम पार्लर मालकिणीला खडेबोल सुनावले होते तो भाग चांगलाच गाजला होता. त्यानंतर ओमची बहीण मालविका पार्लर मालकिणीला हे स्थळ शोधण्यास भाग पाडते असे दाखवण्यात आले.त्यामुळे पुढे काय होणार हे पाहणे कमालीचे ठरणार आहे.

Web Title: New artist's entry in 'Yeu Kashi Tashi Mi Nandayla', find out who this person is

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.