आॅडिशनमध्ये नेहा धूपियाशी अश्लील बोलणाऱ्या स्पर्धकाला धक्के मारून काढले बाहेर!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2018 16:27 IST2018-03-07T10:54:57+5:302018-03-07T16:27:29+5:30

रिअ‍ॅलिटी शोमध्ये दर दिवसाला असे काही घडून जाते, ज्याचा कोणी कधीच विचार करीत नाही. मग तो बिग बॉस हा ...

Neha was shocked by the horrific obscene contestant in the audition! | आॅडिशनमध्ये नेहा धूपियाशी अश्लील बोलणाऱ्या स्पर्धकाला धक्के मारून काढले बाहेर!

आॅडिशनमध्ये नेहा धूपियाशी अश्लील बोलणाऱ्या स्पर्धकाला धक्के मारून काढले बाहेर!

अ‍ॅलिटी शोमध्ये दर दिवसाला असे काही घडून जाते, ज्याचा कोणी कधीच विचार करीत नाही. मग तो बिग बॉस हा सर्वाधिक वादग्रस्त शो असो वा अन्य दुसरा रिअ‍ॅलिटी शो. काही दिवसांपूर्वीच लहान मुलांच्या सिंगिंग रिअ‍ॅलिटी शोमध्ये गायक पापोनवरून एक वाद निर्माण झाला होता. हा वाद एवढा पेटला होता की, पापोनला तो शो सोडावा लागला. आता रिअ‍ॅलिटी शोमध्ये दंग करणारा असाच एक किस्सा समोर आला आहे. होय, त्याचे झाले असे की, रिअ‍ॅलिटी शोमध्ये एका स्पर्धकाने चक्क अभिनेत्रीसोबत फ्लर्ट करण्याचा प्रयत्न केला आहे. विशेष म्हणजे या स्पर्धकाने संबंधित अभिनेत्रीला त्याच्यातील सेक्शुअल क्षमता याबद्दलही सांगितले. त्यामुळे पुन्हा एकदा रिअ‍ॅलिटी शोच्या भोवती वाद निर्माण झाला आहे.

सध्या एम टीव्हीवर प्रसारित होणाºया रोडीज या रिअ‍ॅलिटी शोचे आॅडिशन्स सुरू आहेत. देशभरातील मोठमोठ्या शहरातील स्पर्धक या आॅडिशन्ससाठी रांगा लावत आहेत. याच आॅडिशन्सकरिता शोची संपूर्ण टीम सध्या चंदीगढ येथे दाखल झाली आहे. अभिनेत्री नेहा धूपिया, रघू आणि रणविजय यांनी काही स्पर्धकांचे आॅडिशन्स घेतले. मात्र या आॅडिशनदरम्यान एक स्पर्धक असा आला ज्याने परीक्षक म्हणून बसलेल्या नेहा, रघू आणि रणविजय यांना अक्षरश: हादरा दिला. या स्पर्धकाचे नाव हर्वप्रीत असे होते. 



आॅडिशन दरम्यान, जेव्हा त्याला विचारण्यात आले की, तुला शोमध्ये का बरं यावेसे वाटते? उत्तरात त्याने असे काही सांगितले जे ऐकून तिघेही दंग झाले. हर्वप्रीतने म्हटले की, मी नेहा धूपियाला खूप पसंत करतो. तिच्यासोबत मला फ्लर्ट करण्याची इच्छा आहे. त्यामुळेच मी या शोमध्ये येऊ इच्छितो. हर्वप्रीत येथेच थांबला नाही तर त्याने पुढे सर्व मर्यादेचे उल्लंघन करताना आपल्यातील सेक्शुअल पॉवरही बोलून दाखविली. हर्वप्रीतच्या या इच्छा ऐकून तिघेही दंग राहिले. त्यांनी हर्वप्रीत असे काही सुनवले की, त्याची बोलतीच बंद झाली. 

नेहा धूपियाने तर हर्वप्रीतच्या या उत्तरावर चांगलीच लालबुंद झाली होती. तिने म्हटले की, तुझ्या या बोलण्यावरून हे कळून चुकते की, तुझ्यात महिलांप्रती कुठलाही सन्मान नाही. तू ज्या पद्धतीने तुझ्यातील सेक्शुअल स्ट्रेंथ सांगत आहेत, यावरून तुझी लायकी लक्षात येते. मला नाही वाटत की, तुझ्यासारखा सनकी या शोमध्ये यावा. तुझे हे सगळे ऐकून मला शोमधील इतर महिला स्पर्धकांची चिंता वाटत आहे. तू माझ्या नजरेसमोरून एक क्षणही उभा राहू नकोस. नेहा धूपियाचे इतर परीक्षकांनीदेखील समर्थन केले. शिवाय हर्वप्रीतला सर्वांनी जबरदस्त सुनावले. त्यानंतर शोच्या निर्मात्यांनी त्याला धक्के मारून स्टुडिओच्या बाहेर काढले

Web Title: Neha was shocked by the horrific obscene contestant in the audition!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.