​नकुशी आणि कुलस्वामिनी या मालिकेत साजरे केले जाणार मराठमोळे सण

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 14, 2017 15:49 IST2017-08-14T10:19:12+5:302017-08-14T15:49:12+5:30

श्रावण महिन्यात सगळीकडे व्रतवैकल्य, सण साजरे केले जात आहेत. स्टार प्रवाहच्या मालिकांमध्येही हे सणवार पाहायला मिळणार आहे. नकुशी या ...

Nakushi and Kalswamini will be celebrated in the Marathmokla festival | ​नकुशी आणि कुलस्वामिनी या मालिकेत साजरे केले जाणार मराठमोळे सण

​नकुशी आणि कुलस्वामिनी या मालिकेत साजरे केले जाणार मराठमोळे सण

रावण महिन्यात सगळीकडे व्रतवैकल्य, सण साजरे केले जात आहेत. स्टार प्रवाहच्या मालिकांमध्येही हे सणवार पाहायला मिळणार आहे. नकुशी या मालिकेतील बग्गीवाला चाळीत जन्माष्टमी आणि दहीहंडी साजरी होणार आहे. तर कुलस्वामिनीमध्ये आरोहीची पहिली मंगळागौर होणार का, याची उत्सुकता आहे. 
नकुशी या मालिकेतील नकुशीकडे गोड बातमी आहे. त्यामुळे चाळीत उत्साहाचे वातावरण आहे. आता आलेली कृष्णजन्माष्टमी नकुशीसाठी जास्तच आनंददायी ठरली आहे. बग्गीवाला चाळीत सर्वच सण-उत्सव साजरे होत असतात. आता देखील सर्व चाळकरी एकत्र येऊन कृष्णजन्माष्टमी आणि दहीहंडी साजरी करणार आहेत. ही दहीहंडी थोडी स्पेशल असणार आहे. कारण रणजित अर्थात उपेंद्र लिमयेचं आजवर कधीच न दिसलेलं रूप प्रेक्षकांना यात पाहायला मिळणार आहे. बग्गीवाला चाळीतली कृष्णजन्माष्टमी आणि दहीहंडी कशी साजरी होते, त्यासाठी चाळकरी काय काय तयारी करतात. नकुशी आणि रणजित कशा पद्धतीने त्यात सहभागी होतात हे पाहाणे उत्सुकतेचे ठरणार आहे. 
कुलस्वामिनी या मालिकेत लग्न करून देवधर कुटुंबात आलेली आरोही या कुटुंबाचे परिवर्तन करण्याचा प्रयत्न करत आहे. तिला तिचे सासरे अच्युत देवधर यांचा पाठिंबाही मिळत आहे. मात्र देवधर कुटुंबातील इतर विशेषत: सुवर्णा आरोहीच्या विरोधात आहे. कुटुंबात आरोहीचा प्रभाव वाढत असल्याने ती नाराज आहे. सुवर्णा आरोहीच्या विरोधात सतत कारस्थानेही करत आहे. आरोही राजस आणि अभय यांच्यात अडकल्यासारखी आहे. आपली देखील मंगळागौर व्हावी अशी आरोहीचीही इच्छा आहे. मात्र, देवधर कुटुंबात आजवर कोणताही धार्मिक विधी करण्यात आलेला नाही. आरोहीच्या मंगळागौरीने त्यांच्या कुटुंबात देव-धर्माचे कार्य होणार का , हे पाहाणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

Also Read : ​नकुशी, गोठ, लेक माझी लाडकी, दुहेरी आणि कुलस्वामिनी मालिकेतील नायिकांचा झाला मेकओव्हर

Web Title: Nakushi and Kalswamini will be celebrated in the Marathmokla festival

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.