​‘नकुशी’ फेम प्रसिद्धी आयलवारने घेतली पहिली कार

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 12, 2017 11:37 IST2017-07-12T06:07:52+5:302017-07-12T11:37:52+5:30

'नकुशी' या मालिकेत प्रसिद्धी आयलवार नकुशी ही व्यक्तिरेखा साकारत आहे. या व्यक्तिरेखेने प्रसिद्धीला चांगलीच ओळख मिळवून दिली आहे. प्रसिद्धीची ...

'Nakushhi' Fame is the first car taken by popularity | ​‘नकुशी’ फेम प्रसिद्धी आयलवारने घेतली पहिली कार

​‘नकुशी’ फेम प्रसिद्धी आयलवारने घेतली पहिली कार

'
;नकुशी' या मालिकेत प्रसिद्धी आयलवार नकुशी ही व्यक्तिरेखा साकारत आहे. या व्यक्तिरेखेने प्रसिद्धीला चांगलीच ओळख मिळवून दिली आहे. प्रसिद्धीची ही पहिलीच मालिका आहे. या मालिकेमुळे तिला प्रसिद्धी, पैसा सर्व काही मिळाले आहे. या मालिकेमुळे तिचे एक स्वप्न नुकतेच पूर्ण झाला आहे.
आपल्या स्वत:च्या कमाईतून कार घेण्याचे स्वप्न तिने नुकतेच साकार केले आहे. प्रसिद्धी म्हणजेच प्रेक्षकांची लाडकी नकुशी ही मुळची नागपुरची आहे. तिची बहीण आणि बहिणीचे पती पुण्यात असल्याने तिने पुण्यात गाडी घेण्याचे ठरवले. तिने तिच्या स्वकमाईतून नवीकोरी कार घेतली आहे. प्रसिद्धीने कधीकाळी पाहिलेले स्वप्न आता पूर्ण झाले आहे. त्यामुळे सध्या ती प्रचंड खूश आहे. आपल्या या नव्याकोऱ्या कारविषयी प्रसिद्धी सांगते, 'शूटिंगच्या अनियमित वेळा आणि स्वत:च्या सुरक्षिततेच्या दृष्टीने मी कार घेण्याचा विचार केला. कार घेणे हे खरे तर माझे अनेक वर्षांपासूनचे स्वप्न होते. हे स्वप्न पूर्ण झाल्याने मी प्रचंड आनंदात आहे. मी ही कार माझ्या स्वकष्टातून घेतली असल्याने आज मला स्वतःचा अभिमान वाटत आहे. या माझ्या यशात नकुशीचा खूप मोठा हात आहे. या मालिकेमुळेच मला आज माझ्या पायवर उभे राहाता आले आहे. मी कार घेतल्याचा माझ्या इतकाच आनंद माझ्या घरातल्यांना देखील झाला आहे. त्यांच्या डोळ्यात आज मला आनंदाचे अश्रू पाहायला मिळाले. माझे आई-वडील, बहीण, मित्रमैत्रिणी यांच्या पाठिंब्यामुळे माझी इथवरची वाटचाल झाली.'
एका सामान्य घरातून येऊनही इतके यश मिळवल्याबद्दल प्रसिद्धी आयलवार सध्या प्रचंड खूश आहे. 

Also Read : अभिनेत्री नाही तर मला डेन्टिस्ट बनायचे होतेः प्रसिद्धी आयलवार

Web Title: 'Nakushhi' Fame is the first car taken by popularity

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.