माझ्या नवऱ्याची बायको फेम रसिका सुनील बनली गायिका, ऐका तिने गायलेले हे गाणे
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 25, 2017 16:33 IST2017-04-25T11:03:48+5:302017-04-25T16:33:48+5:30
माझ्या नवऱ्याची बायको या मालिकेतील शनाया म्हणजेच रसिका सुनील ही एक खूप चांगली अभिनेत्री असण्यासोबतच एक चांगली गायिका आहे. तिने तिच्या फॅन्ससाठी गायलेले हे खास गाणे...

माझ्या नवऱ्याची बायको फेम रसिका सुनील बनली गायिका, ऐका तिने गायलेले हे गाणे
म झ्या नवऱ्याची बायको या मालिकेतील शनाया ही प्रेक्षकांची प्रचंड लाडकी आहे. ही भूमिका रसिका सुनील साकारत असून ती एक खूप चांगली अभिनेत्री असल्याचे तिने या मालिकेद्वारे लोकांना दाखवून दिले आहे. या मालिकेत ती एका खलनायिकेच्या भूमिकेत असली तरी ही खलनायिका प्रेक्षकांना चांगलीच भावत आहे. मालिकेत शनाया आता पुढे काय करणार याची लोकांना उत्सुकता लागलेली असते. काहीजण तर तिला भेटल्यावर ती मालिकेत अशी का वागते असे विचारत तिच्यावर चिडतातदेखील. या सगळ्या कारणामुळे रसिका सुनिल हे नाव काहीच दिवसांत प्रसिद्ध झाले आहे.
प्रेक्षकांची ही लाडकी शनाया म्हणजेच रसिका सुनील ही एक चांगली अभिनेत्री असण्यासोबतच एक चांगली गायिका असल्याचे खूपच कमी जणांना माहिती आहे. तिने काही दिवसांपूर्वी तिच्या गायनाचा एक व्हिडिओ इन्स्टाग्राम या वेबसाइटवर पोस्ट केला असून या व्हिडिओला प्रेक्षकांची चांगलीच पसंती मिळत आहे.
रसिकाने माझ्या नवऱ्याची बायको या मालिकेच्या चित्रीकऱणाच्या दरम्यानच हा व्हिडिओ शूट केला आहे. या मालिकेच्या सेटवरील मेकअप रूममध्ये ती आपल्याला गाताना दिसत आहे. जिया लागेना तुम बिना मोरो हे गाणे तिने या व्हिडिओत गायले असून या गाण्याला प्रेक्षकांची चांगलीच पसंती मिळत आहे. हा तिचा व्हिडिओ आतापर्यंत दोन लाखांहून अधिक लोकांनी पाहिला आहे आणि त्यावर अनेकांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. अनेकांनी तिच्या आवाजाचे कौतुकदेखील केले आहे. काहींनी तर तू आणखी काही गाणी गाऊन त्याचा व्हिडिओ पोस्ट कर असेदेखील तिला म्हटले आहे.