/> मालिका आणि चित्रपटांतून आपल्या अभिनयाने प्रेक्षकांना भुरळ पाडणारी अभिनेत्री मृणाल दुसानीस नूकतीच लग्नाच्या बेडीच अडकली आहे. लग्नाच्या वेळी तिने लाल रंगाची भरजरी साडी नेसली होती. हातात हिरवा चुडा, डोक्याला मुंडावळ््या, कानातील मोठे झुबे, गळ््यात पारंपारिक दागिने घालुन सजलेली मृणाल नव-वधुच्या वेषात अधिकच खुलुन दिसत होती. मृणालचे अरेंज मॅरेज झाले असुन, नीरज मोरे यांच्यांसोबत ती आता आयुष्याची नवी ईनींग सुरु करीत आहे. नीरज अमेरिकेतील एका सॉफ्टवेअर कंपनीत जॉब करीत आहे. आता मृणाल सुद्धा तिचा संसार अमेरिकेत जाऊन थाटते का असा प्रश्न तिच्या चाहत्यांना नक्कीच पडला असेल. बाकी काही असो, रिल लाईफ मध्ये अनेकदा लग्न केले असले तरी आता खºया अर्थाने रिअल लाईफ मध्ये मृणाल विवाहबंधनात अडकली आहे. आपण तिच्या भावी आयुष्यासाठी या न्युली मॅरिड कपलला शुभेच्छा देऊयात.
Web Title: Mrinal gets trapped in marriage
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.