काय सांगता ! Miss Universe होण्याआधी या मालिकेत दिसली होती Harnaaz Sandhu, ओळखलं नाही का?

By ऑनलाइन लोकमत | Published: December 16, 2021 12:52 PM2021-12-16T12:52:36+5:302021-12-16T13:00:44+5:30

भारताला 21 वर्षांनी मिस युनिव्हर्स (Miss Universe)चा ताज मिळवून दिल्यानंतर हरनाज (Harnaaz Sandhu)चे फोटो आणि व्हिडिओ इंटरनेटवर व्हायरल होत आहेत. या व्हायरल व्हिडिओंमध्ये हरनाजचा एक जुना व्हिडिओ देखील आहे

Miss universe 2021 harnaaz kaur sandhu had cameo appearance in this tv serial | काय सांगता ! Miss Universe होण्याआधी या मालिकेत दिसली होती Harnaaz Sandhu, ओळखलं नाही का?

काय सांगता ! Miss Universe होण्याआधी या मालिकेत दिसली होती Harnaaz Sandhu, ओळखलं नाही का?

googlenewsNext

मिस युनिव्हर्स  (Miss Universe) 2021 हरनाज संधू (Harnaaz Sandhu) हा सध्या सोशल मीडियावर सर्वाधिक चर्चेत असलेला चेहरा आहे. भारताला  21 वर्षांनी मिस युनिव्हर्सचा ताज मिळवून दिल्यानंतर हरनाजचे फोटो आणि व्हिडिओ इंटरनेटवर व्हायरल होत आहेत. या व्हायरल व्हिडिओंमध्ये हरनाजचा एक जुना व्हिडिओ देखील आहे ज्यामध्ये ती हिंदी मालिकेत दिसत आहे.

हा व्हिडिओ कलर्स चॅनलच्या 'उडारियां' या मालिकेतील आहे ज्यामध्ये हरनाज संधूची छोटीशी भूमिका होती. या मालिकेच्या एका भागात हरनाज एका ब्युटी शोची स्पर्धक म्हणून दिसते आहे. शोमध्ये ती लोकांना पास्ताची रेसिपी सांगताना दिसली होती. गुलाबी आणि पांढऱ्या रंगाच्या लेहेंग्यात कानात झुमके, हातात बांगड्या, हरनाज खरोखरच एखाद्या ब्युटी क्वीनसारखी दिसते. हरनाजचा हा कॅमिओ तेव्हा लोकांच्या लक्षात आला नसेल, पण आज करोडो लोकांच्या मोबाईल स्क्रीनवर तिचा फोटो पाहायला मिळत आहे.

अवघ्या २१ वर्षांची असलेली हरनाज पंजाबमधील चंदीगडची आहे. ती आता पब्लिक अॅडमिनिस्ट्रेशन विषयात पदव्युत्तर पदवीचे शिक्षण घेत आहे. त्याआधी तिने इन्फर्मेशन टेक्नॉलॉजी विषयात पदवीपर्यंत शिक्षण घेतले आहे. हरनाजने नुकताच मिस दिवा मिस युनिव्हर्स २०२१ हा खिताब पटकावला होता. तर २०१९ मध्ये फेमिना मिस इंडिया पंजाब हा खिताबही तिने पटकावला होता. तिने आतापर्यंत अनेक पंजाबी चित्रपटांमध्ये काम केले आहे. 

Web Title: Miss universe 2021 harnaaz kaur sandhu had cameo appearance in this tv serial

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.