​बेहदमध्ये जेनिफर विंगेट आणि कुशाल टंडनने असे केले किसिंग सीनचे चित्रीकरण

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 24, 2017 13:07 IST2017-04-24T07:37:12+5:302017-04-24T13:07:12+5:30

बेहद या मालिकेची कथा, या मालिकेतील व्यक्तिरेखा प्रेक्षकांना प्रचंड आवडत आहे. या मालिकेतील माया आणि अर्जुनच्या केमिस्ट्रीची तर नेहमीच ...

In the meanwhile, Jennifer Wingett and Kushal Tandon did the filming of Kissing Scene | ​बेहदमध्ये जेनिफर विंगेट आणि कुशाल टंडनने असे केले किसिंग सीनचे चित्रीकरण

​बेहदमध्ये जेनिफर विंगेट आणि कुशाल टंडनने असे केले किसिंग सीनचे चित्रीकरण

हद या मालिकेची कथा, या मालिकेतील व्यक्तिरेखा प्रेक्षकांना प्रचंड आवडत आहे. या मालिकेतील माया आणि अर्जुनच्या केमिस्ट्रीची तर नेहमीच चर्चा असते. माया या व्यक्तिरेखेला तर प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे. जेनिफर विंगेट पहिल्यांदाच प्रेक्षकांना एका ग्रे शेड असलेल्या भूमिकेत दिसत असल्यामुळे तिचे फॅन्स प्रचंड खूश आहेत. या मालिकेच्या कथेप्रमाणे या मालिकेतील बोल्ड दृश्यांची नेहमीच चर्चा असते. आतादेखील प्रेक्षकांना मालिकेत एक बोल्ड दृश्य पाहायला मिळणार आहे. 
बेहद या मालिकेत आतापर्यंत दाखवल्या गेलेल्या बोल्ड दृश्यांपेक्षा अधिक बोल्ड दृश्य नुकतेच चित्रीत करण्यात आले. या दृश्याबद्दल कुशल आणि जेनिफर यांना सांगण्यात आल्यानंतर त्या दोघांनीही काहीही आढेवेढे न घेता या दृश्यासाठी होकार दिला. मालिकेच्या कथानकासाठी या दृश्याची अत्यंत गरज असल्याचे त्या दोघांचे म्हणणे होते. या दृश्याचे चित्रीकरण करत असताना खूपच कमी मंडळी सेटवर होती. हे दृश्य चित्रीत करण्याआधी जेनिफरने मालिकेच्या टीमसमोर एक अट ठेवली होती. हे दृश्य एका टेकमध्ये केले जावे, यासाठी ती रिटेक देणार नसल्याचे तिने आधीच स्पष्ट केले होते. 
मालिकेच्या कथानकानुसार मालिकेत किसिंग सीनची गरज होती. लेखकाने हे दृश्य लिहिले असले तरी त्यावर जेनिफर कशी प्रतिक्रिया देईल असा सगळ्यांना प्रश्न पडला होता. पण ती खूपच शांत होती. किस करणे हे मालिकेच्या कथानकाच्या दृष्टीने गरजेचे असल्याने तिने किसिंग दृश्याचे चित्रीकरण केले. जेनिफरने मालिकेच्या टीमकडे केलेली मागणी योग्य असल्याचे टीमचे म्हणणे असल्याने त्यांनीदेखील एका टेकमध्ये हे दृश्य पूर्ण केले. 

Web Title: In the meanwhile, Jennifer Wingett and Kushal Tandon did the filming of Kissing Scene

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.