​मे आय कम इन मॅडन फेम संदीप आनंद सांगतोय, काम करण्यातच मिळतो मला आनंद

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2017 13:09 IST2017-01-28T07:39:06+5:302017-01-28T13:09:06+5:30

मे आय कम इन मॅडम या मालिकेत संदीप आनंद प्रमुख भूमिका साकारत आहे. या मालिकेतील त्याच्या भूमिकेला प्रेक्षकांची पसंतीदेखील ...

May I cum in Madan Fame, Sandeep Anand is saying, I get pleasure from work only | ​मे आय कम इन मॅडन फेम संदीप आनंद सांगतोय, काम करण्यातच मिळतो मला आनंद

​मे आय कम इन मॅडन फेम संदीप आनंद सांगतोय, काम करण्यातच मिळतो मला आनंद

आय कम इन मॅडम या मालिकेत संदीप आनंद प्रमुख भूमिका साकारत आहे. या मालिकेतील त्याच्या भूमिकेला प्रेक्षकांची पसंतीदेखील मिळत आहे. पण या मालिकेच्या चित्रीकरणासाठी संदीपला अधिकाधिक वेळ द्यावा लागतो. मालिकेत तो प्रमुख भूमिका साकारत असल्याने प्रत्येक दृश्यात तो असतो. त्यामुळे त्याचा संपूर्ण दिवसच चित्रीकरणात जातो. त्याला आराम करण्यासाठी थोडादेखील वेळ मिळत नाही. कामामुळे त्याचे शेड्युल अतिशय व्यग्र असल्याने त्याला त्याच्या वैयक्तिक आयुष्यासाठीदेखील वेळ देता येत नाही. पण याची तो कधीच तक्रार करत नाही. 
संदीपला फुटबॉल खेळायला खूप आवडतो. या मालिकेच्या आधी वेळात वेळ काढून तो अनेकवेळा त्याचे इंडस्ट्रीतील मित्र बरुण सोबती, अक्षय डोगरा यांच्यासोबत फुटबॉल खेळत असे. पण सध्या त्याला त्याच्या या आवडत्या खेळालादेखील वेळ देता येत नाहीये. संदीपचे कामाबद्दल प्रचंड पॅशन असल्याने तो सगळ्याच पहिले महत्त्व हे कामालाच देतो. याबाबत संदीप सांगतो, "अभिनय करणे हे फूल टाइम जॉब केल्यासारखेच असते. त्यामुळे तुमच्या कामाच्या बाबतीच तुम्ही परफेक्ट असणे गरजेचे आहे. अभिनय माझे पॅशन असल्याने मी जे करतो, त्या गोष्टीत मला खूप आनंद मिळतो. मला आराम करायला वेळ मिळत नाही हे खरे आहे. पण ज्यावेळी तुम्ही तुमचे काम एन्जॉय करायला लागता, त्यावेळी तुम्ही काम करत असतानादेखील हॉलिडेवर आहात असेच तुम्हाला वाटते. माझ्या फॅन्सने आजवर माझ्यावर केलेल्या प्रेमामुळेच मला काम करण्याची इतकी ताकद मिळत आहे. त्यांच्या या प्रेमासाठी मी त्यांचा नेहमी ऋणी राहीन." 


Web Title: May I cum in Madan Fame, Sandeep Anand is saying, I get pleasure from work only

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.