'मन उडू उडू झालं' फेम दिपू उर्फ हृता दुर्गुळे या कारणामुळे झाली ट्रोल, चाहते व्यक्त करताहेत नाराजी

By ऑनलाइन लोकमत | Published: March 30, 2022 02:18 PM2022-03-30T14:18:41+5:302022-03-30T14:19:19+5:30

Hruta Durgule: हृता दुर्गुळेचा एक व्हिडीओ व्हायरल होताना दिसत आहे. या व्हिडीओवर अनेकांनी टीका देखील केलीय.

'Man Udu Udu Jhala' fame Dipu alias Hruta Durgule has become a troll due to this reason, fans are expressing displeasure | 'मन उडू उडू झालं' फेम दिपू उर्फ हृता दुर्गुळे या कारणामुळे झाली ट्रोल, चाहते व्यक्त करताहेत नाराजी

'मन उडू उडू झालं' फेम दिपू उर्फ हृता दुर्गुळे या कारणामुळे झाली ट्रोल, चाहते व्यक्त करताहेत नाराजी

googlenewsNext

झी मराठी (Zee Marathi) वाहिनीवरील 'मन उडू उडू झालं' (Man Udu Udu Jhala) या मालिकेनं कमी कालावधीत प्रेक्षकांच्या मनात घर केले आहे. या मालिकेतील इंद्रा आणि दिपू यांची केमिस्ट्री चाहत्यांना खूप भावते आहे. इंद्राची भूमिका अभिनेता अजिंक्य राऊत(Ajinkya Raut)ने साकारली आहे. तर दिपूची भूमिका हृता दुर्गुळे (Hruta Durgule) हिने निभावली आहे. हृता दुर्गुळे टेलिव्हिजनवरील लोकप्रिय अभिनेत्री आहे. तिचा प्रचंड फॅन फॉलोव्हिंग आहे. हृता दुर्गुळेचा एक व्हिडीओ व्हायरल होताना दिसत आहे. या व्हिडीओवर अनेकांनी टीका देखील केली आहे. 

हृता दुर्गुळे हिने नुकतीच आपल्या चाहत्यांना एक खूशखबर दिली होती. ही खुशखबर म्हणजे तिने इंस्टाग्रामवर जवळपास दोन मिलियन फॉलोव्हर झाल्याचे म्हटले होते. मराठी सिनेइंडस्ट्रीत इतक्या मोठ्या प्रमाणात फॅन फॉलोईंग असणारी ती एकमेव अभिनेत्री असल्याचे देखील सांगण्यात येत आहे. त्यामुळे देखील हृताची चर्चा गेल्या काही दिवसांपासून होत आहे. मात्र हृताला तिच्या प्रियकरावरून ट्रोल करण्यात आले आहे. तिच्या प्रियकराचे नाव प्रतीक शहा आहे.

काही दिवसांपूर्वी हृता दुर्गुळे आणि प्रतीक शहा यांचा साखरपुडा पार पडला. प्रतीक हा मराठीतील मुग्धा शहा या अभिनेत्रीचा मुलगा आहे. मुग्धा शहा यांनी अनेक मालिका आणि चित्रपटात देखील काम केले आहे. प्रतीक आणि हृता गेल्या अनेक दिवसांपासून एकमेकांना डेट करत असल्याचे सांगण्यात येते.


मात्र, आता तिला ट्रोल करण्याचे कारण म्हणजे तिने हिंदीमध्ये काम करण्यासाठी प्रतीकला डेट करते आहे. ती प्रतीक सोबत लग्न करणार असल्याचे सांगण्यात येते. मात्र, मराठी मुलगा तुला भेटले नाहीत का? असं देखील तिला अनेक जण विचारत आहेत. या टिकेनंतर हृता मात्र चांगलीच चिडली आहे. कारण प्रेमात कुठलीही जात पाहून प्रेम करता येत नाही. मात्र अशा प्रकारे टीका होत असल्याने ती नाराज झाली आहे.

Web Title: 'Man Udu Udu Jhala' fame Dipu alias Hruta Durgule has become a troll due to this reason, fans are expressing displeasure

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.