‘मी तीन दिवस सलग झोपलो नाहीये, कारण..., ’ विराजसची पोस्ट वाचून चाहत्यांनी घेतली मजा

By ऑनलाइन लोकमत | Published: June 19, 2022 11:13 AM2022-06-19T11:13:26+5:302022-06-19T11:14:14+5:30

Virajan Kulkarni New Post : शिवानी व विराजसचं लग्नं नवं नवं आहे आणि अशात विराजसची एक पोस्ट सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतेय. होय, विराजसने शेअर केलेल्या या पोस्टनंतर चाहते त्याची चांगलीच मजा घेत आहेत.

majha hoshil na fame marathi actor virajas kulkarni new post viral | ‘मी तीन दिवस सलग झोपलो नाहीये, कारण..., ’ विराजसची पोस्ट वाचून चाहत्यांनी घेतली मजा

‘मी तीन दिवस सलग झोपलो नाहीये, कारण..., ’ विराजसची पोस्ट वाचून चाहत्यांनी घेतली मजा

googlenewsNext

Virajan Kulkarni New Post : सर्वांचा लाडका अभिनेता  विराजस कुलकर्णी  ( Virajan Kulkarni) नुकताच लग्नबंधनात अडकला. अभिनेत्री शिवानी रांगोळेसोबत (Shivani Rangole) त्याने लग्नगाठ बांधली. गेल्या 3 मे रोजी दोघांचा थाटामाटात लग्नसोहळा पार पडला होता. शिवानी व विराजसचं लग्नं नवं नवं आहे आणि अशात विराजसची एक पोस्ट सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतेय. होय, विराजसने शेअर केलेल्या या पोस्टनंतर चाहते त्याची चांगलीच मजा घेत आहेत. लग्न झालं आता तुझं... आत्ता असंच होणार, म्हणत त्याची मस्करी करत आहेत.

आता विराजसने अशी काय पोस्ट केली, असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. तर ‘मी तीन दिवस सलग झोपलो नाहीये..., ’असं त्याने या पोस्टमध्ये म्हटलं आहे. विशेष म्हणजे असं का? याचं कारणही त्याने सांगितलं आहे. ‘मी तीन दिवस सलग झोपलो नाहीये... कारण अधून मधून उठावं लागतं...,’ असं त्याने लिहिलं आहे.

विराजसच्या या पोस्टचा चाहत्यांनी त्यांना वाट्टेल तसा अर्थ काढला आहे. अनेकांनी मजेशीर कमेंट्स केल्या आहेत. ‘नवीन लग्न झालं की अधून मधून रात्री उठणं स्वाभाविक आहे,’ असं एकाने लिहिलं आहे. लग्न झालं आता तुझं, आता असंच होणार, अशी कमेंट एकाने केली आहे. अनेकांनी त्याला कॅप्शन किंग म्हणत त्याचं कौतुक केलं आहे.
या पोस्टसोबत विराजने एक ब्लॅक अ‍ॅण्ड व्हाईट फोटोही शेअर केला आहे. यात त्याने फ्लोरल प्रिंट असलेला शर्ट घातलेला आहे.
शिवानी व विराजसच्या लग्नाची जोरदार चर्चा झाली होती. या लग्नाचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. लग्नानंतर विराजस व शिवानीच्या लग्नाचं ग्रॅण्ड रिसेप्शन पार पडलं होतं.

 शिवानी व विराजस दीर्घकाळापासून रिलेशनशिपमध्ये होते. ‘डावीकडून चौथी बिल्डिंग’ या विराजसच्या नाटकात शिवानीनं अभिनय केला होता. तेव्हाच दोघांची ओळख झाली होती. या नाटकाच्या सेटवर त्यांची मैत्री झाली आणि मग ही मैत्री प्रेमात बदलली.

विराजसच्या वर्क फ्रंटविषयी बोलायचं झालं तर नुकताच विराजसच्या  ‘मिकी’ या 2 अंकी विनोदी नाटकाचा प्रयोग पुण्यात पार पडला. या नाटकात विराजसनं सखाराम चव्हाण हे पात्र साकारलं आहे.  तर शिवानीबद्दल सांगायचं तर तिची नेटफ्लिक्सवर एक नवी ‘शी’या सीरिजचा दुसरा सीझन नुकताच रिलीज झाला आहे.

Web Title: majha hoshil na fame marathi actor virajas kulkarni new post viral

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.