'...अक्षरश: माझ्या अंगावर काटा आला', 'रमा राघव' फेम निखिल दामलेनं सांगितला तो अनुभव

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2023 10:56 IST2023-02-11T10:56:33+5:302023-02-11T10:56:53+5:30

Rama Raghav : पैजेवर जग जिंकणारी 'रमा' आणि प्रेमाने जग आपलेसे करणारा 'राघव' यांची खट्याळ जोडी सगळयांच्या पसंतीस उतरत आहे.

'...Literally: I got a thorn in my side', says Nikhil Damle of 'Rama Raghav' fame. | '...अक्षरश: माझ्या अंगावर काटा आला', 'रमा राघव' फेम निखिल दामलेनं सांगितला तो अनुभव

'...अक्षरश: माझ्या अंगावर काटा आला', 'रमा राघव' फेम निखिल दामलेनं सांगितला तो अनुभव

कलर्स मराठीवरील रमा राघव (Rama Raghav) मालिका प्रेक्षकांची मने जिंकत आहे. पैजेवर जग जिंकणारी 'रमा' आणि प्रेमाने जग आपलेसे करणारा 'राघव' यांची खट्याळ जोडी सगळयांच्या पसंतीस उतरत आहे. संस्कार ,संस्कृती, परिश्रम याशिवाय आयुष्यात काही मिळत नसतं याची शिकवण अंगी भिनलेल्या राघवचे पात्र निखिल दामले साकारत आहे. रमाचे पात्र ऐश्वर्या साकारत आहे. 

मालिकेतील या दोघांमधील तिखट नोकझोक आणि खट्याळ भांडण बघायला मिळत आहे. निखिल दामले याबद्दल बोलताना त्याने काही अनुभव सांगितले. तो म्हणाला ,या मालिकेची प्रोसेस खूपच इंटरेस्टिंग होती. मला जेव्हा या भूमिकेची विचारणा झाली तेव्हा त्यात मला अस्खलित श्लोक, पल्लेदार संवाद म्हणायचे होते आणि यावरून मला अंदाज आला की माझे पात्र काय असू शकते. देवा धर्माचे करणारा, आदर्श मुलगा आणि त्यानुसार मी तयारी करायला सुरुवात केली. पहिले मला वाटलं एखादे दोन श्लोक असतील मग होऊन जाईल आरामात करू शकू. लहानपणापासून मला श्लोक म्हणायची सवय आई बाबांमुळे लावली होती.


पुढे तो म्हणाला की, मालिकेच्या एका सीनमध्ये मला खूप मोठा श्लोक म्हणायचा होता मी म्हटला देखील पण मला कुठेतरी वाटत होते की मी अजून छान करु शकतो. मला असे कळले की तो सीन करप्ट झाला आणि तो सिन पुन्हा शूट करण्याची संधी मला मिळाली आणि जेव्हा रिशूट केला तेव्हा मला आनंद झाला मला असे वाटते देवाने ऐकले माझे. पालखीचा अॅक्शन पॅक सीन शूट करताना खूप तयारी करावी लागली कारण मी प्रथमच मी असे काही शूट करत होतो. हार्नेसचा सीन शूट करत असताना मी जरा अनकंफर्टेबल होतो कारण माझी ती पहिलीच वेळ होती आणि तो करत असताना अपघात होता होता वाचला कारण मला रमाने म्हणजेच ऐश्वर्याने वाचवले. जेव्हा मी तो सिन पाहिला तेव्हा अक्षरश: माझ्या अंगावर काटा आला. हळूहळू त्याची सवय झाली पण मला कुठेतरी वाटलं कि हार्नेस देखील मी करू शकेन. त्यांनतर फक्त मास्टर शॉटसाठी मी हार्नेस वापरला आणि पूर्ण सिन हार्नेसशिवाय केला.

Web Title: '...Literally: I got a thorn in my side', says Nikhil Damle of 'Rama Raghav' fame.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.