कविता कौशिक अडकली लग्नबंधनात
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2017 11:21 IST2017-01-28T05:51:05+5:302017-01-28T11:21:05+5:30
एफआयआर या मालिकेमुळे नावारूपाला आलेली कविता कौशिक नुकतीच लग्नबंधनात अडकली. तिने तिचा जवळचा मित्र रोनित बिस्वाससोबत हिमालयाच्या थंडगार वातावरणात ...

कविता कौशिक अडकली लग्नबंधनात
ए आयआर या मालिकेमुळे नावारूपाला आलेली कविता कौशिक नुकतीच लग्नबंधनात अडकली. तिने तिचा जवळचा मित्र रोनित बिस्वाससोबत हिमालयाच्या थंडगार वातावरणात लग्न केले. रोनित आणि कविता गेल्या कित्येक महिन्यांपासून नात्यात आहेत. त्यांनी काहीच दिवसांपूर्वी लग्न करण्याचा निर्णय घेतला. केदारनाथमधील शिव-पार्वती मंदिरात जाऊन अतिशय साधेपणाने कविता आणि रोनितने लग्न केले. त्यांनी लग्नाच्या पत्रिका छापल्या नाहीत की कोणाला जास्त बोलावलेदेखील नाही. केवळ जवळच्या मित्रमैत्रिणांच्या आणि कुटुंबियांच्या उपस्थित ते दोघे लग्नबंधनात अडकले. तिच्या हळदीचा आणि मेहेंदीचा कार्यक्रम मुंबईत तिच्या घरी झाला.
कविताने इन्स्टाग्राम या सोशल नेटवर्किंग साइटवर तिच्या लग्नाचे काही फोटो पोस्ट केले आहेत. कविताच्या लग्नाला तिची जवळची मैत्रीण अभिनेत्री आक्षका गोराडिया उपस्थित होती. लग्नात तसेच हळदीला ती सतत कवितासोबतच होती. तसेच आक्षकाचा अमेरिकन प्रियकर ब्रेंट गोबलनेदेखील लग्नाला हजेरी लावली. कविताने हिमालयाला जात असतानाचे काही मजा-मस्तीचे फोटो पोस्ट केले आहेत.
![kavita kaushik husband]()
एका फोटोत ती आणि आक्षका त्यांची मेहेंदी दाखवत असल्याचे आपल्याला पाहायला मिळत आहे. तसेच लग्न केल्यानंतर त्यांनी हिमालयाच्या सान्निध्यातदेखील एक फोटो काढला आहे. या फोटोत कविताने साडी नेसली असून खूप सारे दागिने घातले आहेत. भारतीय वधूच्या वेशात ती खूपच सुंदर दिसत आहे.
![kavita kaushik marriage]()
रोनितसोबत लग्न करण्याआधी कविताचे अभिनेता नवाब शहा याच्यासोबत पाच वर्षं प्रेमप्रकरण सुरू होते. त्यांनी काहीच महिन्यांपूर्वी संगनमताने त्यांच्या नात्याला पूर्णविराम दिला. कविता आणि नवाब यांना लग्न करायचे होते. पण कविताच्या आईवडिलांनी या लग्नाला नकार दिला होता. त्या दोघांचा धर्म वेगवेगळा असल्याने कविताच्या पालकांनी लग्नाला नकार दिला असल्याची चर्चा होती. आपल्या आईवडिलांना नाराज करुन लग्न करायचे नसल्याने तिने ब्रेकअपचा निर्णय घेतला होता.
![kavita kaushik marriage photos]()