करिना कपूरला हा क्रिकेटर वाटतो हॉट, मुलाखतीच्या दरम्यान दिली कबुली
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 26, 2018 13:30 IST2018-05-26T08:00:55+5:302018-05-26T13:30:55+5:30
भारतीय क्रिकेट टीमचा कर्णधार विराट कोहलीचे फॅन फॉलॉव्हिंग प्रचंड आहे. त्याच्या फॅन्समध्ये स्त्रियांचे प्रमाण तर खूपच जास्त आहे. विराट ...

करिना कपूरला हा क्रिकेटर वाटतो हॉट, मुलाखतीच्या दरम्यान दिली कबुली
भ रतीय क्रिकेट टीमचा कर्णधार विराट कोहलीचे फॅन फॉलॉव्हिंग प्रचंड आहे. त्याच्या फॅन्समध्ये स्त्रियांचे प्रमाण तर खूपच जास्त आहे. विराट एक चांगला क्रिकेटर असल्याने अनेकांना तो आवडतो. पण त्याच्या खेळासोबतच त्याच्या दिसण्याची आणि शरीरयष्ठीची नेहमीच चर्चा रंगते. विराटने अभिनेत्री अनुष्का शर्माशी लग्न केले आहे. त्यामुळे विराटचे बॉलिवूड इंडस्ट्रीशी देखील खूप जवळचे संबंध आहेत. विराट हा हॉट असल्याचे बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री करिना कपूरचे म्हणणे असून तिने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत जाहीरपणे याविषयी सांगितले आहे.
आयपीएल क्रिकेट स्पर्धेची सांगता येत्या वीकेण्डला होत असताना २७ मे रोजी स्टार प्लसने अंतिम सामन्यापूर्वी दोन तासाच्या एका खास कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. क्रिकेट फायनल पार्टी तो बनती है नावाच्या या कार्यक्रमात बॉलिवूड आणि टीव्हीवरील अनेक सेलिब्रिटी सहभागी होणार आहेत. या सेलिब्रिटींपैकी एक बॉलिवूडची आघाडीची अभिनेत्री करिना कपूर असणार आहे.
करिनाने अलीकडेच मुंबईत क्रिकेट फायनल पार्टी तो बनती है या कार्यक्रमाचे चित्रीकरण केले आणि त्यात ती आपल्या वीरे दी वेडिंग या आपल्या आगामी चित्रपटाच्या प्रमोशनसाठी सहभागी झाली होती. यावेळी तिला कोणता क्रिकेटपटू सर्वाधिक आवडतो, असे विचारले असता ती म्हणाली, “मला विराट कोहली खूप आवडतो. कारण तो तंदुरूस्त आहे आणि मला तो खरंच ‘हॉट’ वाटतो... पण आता त्याचं लग्न झाले असल्याने मला माझा नबाबच अधिक प्रिय आहे!”
क्रिकेट फायनल पार्टी तो बनती है या कार्यक्रमात तिने क्रिकेट या खेळाविषयी खूप साऱ्या गप्पा मारल्या. आपल्याला क्रिकेट हा खेळ खूप आवडतो, असे देखील तिने सांगितले. ती म्हणाली की, मी लहान असताना हा खेळ कशा प्रकारे खेळला जातो याची मला नेहमीच उत्सुकता असायची. आजकालचे क्रिकेट सामने हे खेळ वाटत नाहीत, तर एक लढाई सुरू आहे असे वाटते. अनेकवेळा तर शेवटच्या बॉलपर्यंत अटीतटीचा सामना रंगतो. त्यामुळे क्रिकेट पाहायला अधिक मजा येते.
Also Read : सोनम कपूरच्या लग्नात स्टायलिश अंदाजात अवतरला छोटा नवाब