​करण मेहराची पत्नी निशा रावाळचे झाले डोहाळ जेवण

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 2, 2017 17:11 IST2017-05-02T11:41:40+5:302017-05-02T17:11:40+5:30

ये रिश्ता क्या कहलाता है या मालिकेतील नैतिकच्या भूमिकेत झळकलेला करण मेहरा सध्या चांगलाच खूश आहे. कारण त्याची पत्नी ...

Karan Mehra's wife Nisha Rowal has a dysfunctional meal | ​करण मेहराची पत्नी निशा रावाळचे झाले डोहाळ जेवण

​करण मेहराची पत्नी निशा रावाळचे झाले डोहाळ जेवण

रिश्ता क्या कहलाता है या मालिकेतील नैतिकच्या भूमिकेत झळकलेला करण मेहरा सध्या चांगलाच खूश आहे. कारण त्याची पत्नी निशा रावळ लवकरच बाळाला जन्म देणार आहे. 
करण मेहराने तब्येतीच्या कारणामुळे काहीच महिन्यांपूर्वी ये रिश्ता क्या कहलाता या मालिकेला रामराम ठोकला. या मालिकेनंतर तो कोणत्या कार्यक्रमात झळकणार याची उत्सुकता त्याच्या फॅन्सना लागली होती. ये रिश्ता क्या कहलाता है या मालिकेनंतर काहीच महिन्यात तो बिग बॉस या कार्यक्रमात झळकला. ये रिश्ता क्या कहलाता है या मालिकेच्या लोकप्रियतेमुळे करण बिग बॉसचा एक प्रबळ दावेदार मानला जात होता. पण त्याला काहीच आठवड्यात बिग बॉसचे घर सोडावे लागले. 
निशा आणि करण हे छोट्या पडद्यावरचे एक प्रसिद्ध कपल आहे. त्यांनी त्यांच्या आयुष्यातील हा महत्त्वाचा क्षण त्यांच्या फॅन्ससोबत सोशल मीडियाच्या माध्यमातून शेअर केला होता. निशाने इन्स्टाग्राम या सोशल नेटवर्किंग साईटद्वारे ही गुड न्यूज सगळ्यांना दिली होती. निशाने पोटाला हात लावलेला एक फोटो शेअर केला होता आणि त्यासोबत लिहिले होते की, माझे वजन वाढल्यामुळे कित्येक दिवसांपासून मी गरोदर असल्याचा सगळ्यांनाच संशय येत आहे. हो, हे खरे आहे. लवकरच आमचे पहिले बाळ या जगात येणार आहे. आम्हाला सगळ्यांना तुमच्या शुभेच्छांची खूप गरज आहे.
निशाचे नुकतेच डोहाळ जेवण करण्यात आले असून या डोहाळ जेवणाचे फोटो निशाने सोशल मीडियाला पोस्ट केले आहेत. निशाच्या डोहाळ जेवणाला छोट्या पडद्यावरील अनेक कलाकारांनी उपस्थिती लावली होती. देबिना बॅनर्जी, युविका चौधरी, डिझायनर रोहित वर्मा यांसारखे अनेक सेलिब्रिटी तिच्या डोहाळ जेवणाला उपस्थित होते. निशा रावळदेखील एक प्रसिद्ध मॉडेल आहे. 

Web Title: Karan Mehra's wife Nisha Rowal has a dysfunctional meal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.