​कपिल शर्माने ट्विटरद्वारे प्रसारमाध्यमांना अर्वाच्य भाषेत केली शिवीगाळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2018 18:47 IST2018-04-06T12:56:59+5:302018-04-06T18:47:44+5:30

कपिल शर्मा आणि कॉन्ट्रोव्हर्सी हे नेहमीच जवळचे नाते राहिले आहे आणि आता तर कपिल शर्माने ट्विटर या सोशल नेटवर्किंगच्या ...

Kapil Sharma made the media miserable in Twitter | ​कपिल शर्माने ट्विटरद्वारे प्रसारमाध्यमांना अर्वाच्य भाषेत केली शिवीगाळ

​कपिल शर्माने ट्विटरद्वारे प्रसारमाध्यमांना अर्वाच्य भाषेत केली शिवीगाळ

िल शर्मा आणि कॉन्ट्रोव्हर्सी हे नेहमीच जवळचे नाते राहिले आहे आणि आता तर कपिल शर्माने ट्विटर या सोशल नेटवर्किंगच्या माध्यमातून प्रसारमाध्यमांना शिवीगाळ केली आहे. सलमान खानला झालेल्या शिक्षेबाबत त्याने काही ट्वीट केले असून या ट्वीटमध्ये प्रसारमाध्यमांना शिव्या दिल्या आहेत. कोणताही सुसंस्कृत व्यक्ती जे शब्द चारचौघांत बोलायला धजावतात, त्यापेक्षा देखील वाईट शब्द कपिलने मीडियासाठी वापरले आहेत. कपिलने ट्वीट करत म्हटले आहे की, मी पंतप्रधान असतो तर फेक न्यूज देणाऱ्यांना फाशीची शिक्षा दिली असती. सोर्सेसच्या नावावर बातम्या दिल्या जातात. पण हे सोर्सेस कोण हे सांगितलेच जात नाही. तुमचे पेपर विकण्यासाठी नकारात्मक बातम्या देऊ नका. तो चांगला माणूस आहे... तो लवकरच बाहेर येईल... येवढे मोठे घोटाळे झाले तेव्हा देखील कोणच काहीही बोलले नाही. नकारात्मक बातम्या करण्यासाठी किती पैसे घेता... 
या ट्वीटसमध्ये त्याने अनेक शिव्यादेखील लिहिल्या आहेत. स्पॉटबॉय या वेबसाईटला तर त्याने चांगलेच सुनावले आहेत. अतिशय वाईट भाषेत शिवीगाळ करणारे चार-पाच मेसेज केल्यानंतर कपिलने ते लगेचच डीलिट केले. एवढेच नव्हे तर त्यानंतर काहीच वेळात मी सगळ्यांची माफी मागतो... पण माझे अकाऊंट हॅक झाले होते. मी कोणतेही मेसेजेस केलेले नाहीत किंवा कोणाला शिव्या दिल्या नाहीत असे ट्वीट त्याने केले. पण ते देखील ट्वीट त्याने काहीच मिनिटांमध्ये डीलिट केले. या सगळ्या प्रकरणामुळे कपिलवर नेटिझन्स प्रचंड चिडले आहेत. 
ट्विटरवरून शिव्या देण्याची कपिलची ही पहिलीच वेळ नाहीये. याआधी देखील कपिलने अशाप्रकारचे कृत्य केले आहे. काहीच दिवसांपूर्वी देखील असेच घडले होते. कपिलच्या फॅमिली टाईम विद कपिल शर्मा या शोच्या दुसऱ्या एपिसोडसाठी टायगर श्रॉफ शूट करणार होता. पण हे शूट कपिलने ऐनवेळी रद्द केले अशा बातम्या मीडियात आल्या होत्या. याआधी देखील द कपिल शर्मा शो या कार्यक्रमाच्या चित्रीकरणाच्यावेळी कपिलची तब्येत वारंवार बिघडायला लागली होती. त्यामुळे अनेक सेलिब्रेटींना कपिलच्या सेटवर येऊन शूटिंग न करताच परतावे लागले होते. याही वेळी नेमका हाच कित्ता गिरवला जात असल्याचे म्हटले जात होते. पण कपिलनेच या बातम्या निव्वळ अफवा असल्याचे सांगत याबद्दल ट्विटरवर संताप व्यक्त केला होता. ‘टायगर माझ्या दुसऱ्या शोच्या शूटींगसाठी येणारच नव्हता. त्यामुळे त्याच्यासोबतचे शूट रद्द झाल्याचा प्रश्नच येत नाही. ट्विटर काय आता केवळ स्पष्टीकरण आणि खुलासे देण्यासाठीच उरले आहे काय? असा सवाल त्याने ट्वीटरवर विचारला होता.  

kapil sharma twitter

kapil sharma twitter



Also Read : ​कपिल शर्माच्या नव्या शोने केली चाहत्यांची निराशा! सोशल मीडियावर अशा दिल्या प्रतिक्रिया!!

Web Title: Kapil Sharma made the media miserable in Twitter

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.