​अक्षय कुमार करणार तुझ्यात जीव रंगला या मालिकेत जॉली एलएलबी 2चे प्रमोशन

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 25, 2017 17:22 IST2017-01-25T11:52:55+5:302017-01-25T17:22:55+5:30

तुझ्यात जीव रंगला या मालिकेला सध्या चांगलाच टीआरपी मिळत आहे. रांगडा गडी राणा आणि गावातील शिक्षिका अंजली यांची प्रेमकथा ...

Jolly LLB 2 promotion in Akshay Kumar's life series | ​अक्षय कुमार करणार तुझ्यात जीव रंगला या मालिकेत जॉली एलएलबी 2चे प्रमोशन

​अक्षय कुमार करणार तुझ्यात जीव रंगला या मालिकेत जॉली एलएलबी 2चे प्रमोशन

झ्यात जीव रंगला या मालिकेला सध्या चांगलाच टीआरपी मिळत आहे. रांगडा गडी राणा आणि गावातील शिक्षिका अंजली यांची प्रेमकथा प्रेक्षकांना चांगलीच भावत आहे. स्वभावाने अतिशय भोळा असलेला राणा आता अंजलीला आवडू लागलाय तर राणाच्याही मनात तिच्याविषयी प्रेमभावना फूलू लागल्या आहेत. पण अद्याप दोघांनीही आपल्या प्रेमाची कबुली दिलेली नाही. या दोघांना एकमेकांविषयी असलेल्या प्रेमाची जाणीव निर्माण करून द्यायचे काम आता अक्षय कुमार करणार आहे.
हो, तुम्ही ऐकले ते अगदी बरोबर आहे, तुझ्यात जीव रंगला या मालिकेत प्रेक्षकांना दोन भागांसाठी बॉलिवुडचा सुपरस्टार अक्षय कुमारला पाहायला मिळणार आहे. अक्षयच्या जॉली एलएलबी 2 हा चित्रपट पुढील महिन्यात प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचे सध्या जोरदार प्रमोशन सुरू आहे. या चित्रपटाचे प्रमोशन करण्याची एकही संधी अक्षय सोडत नाहीये. अक्षय या चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी हिंदी मालिका आणि रिअॅलिटी शोमध्ये झळकणार आहे. त्याचसोबत तो तुझ्यात जीव रंगला या मालिकेतदेखील दिसणार आहे. 
तुझ्यात जीव रंगला या मालिकेच्या या खास भागाचे चित्रीकरण नुकतेच एका पंचताराकित हॉटेलमध्ये करण्यात आले. या मालिकेचे सगळे चित्रीकरण हे कोल्हापूरमधील काही भागांमध्ये होते. पहिल्यांदा वेगळ्या ठिकाणी चित्रीकरण करायला मिळत असल्याने या मालिकेतील सगळेच कलाकार खूप खूश होते. अक्षय कुमारसोबत काम करण्यासाठी सगळेच खूप उत्सुक होते. पण अक्षय हा सुपरस्टार असल्याने तो आपल्याशी कसा वागेल याचेदेखील सगळ्यांना दडपण आले होते. पण अक्षयने त्याच्या खेळकर स्वभावाने सगळ्यांचे दडपण क्षणात दूर केले. त्याने कलाकारांशी, तंत्रज्ञानांशी सगळ्यांशी मनमोकळ्या गप्पा मारल्या. या मालिकेत अक्षय मराठी बोलतानादेखील आपल्याला दिसणार आहे. 
यापूर्वी अक्षयने चला हवा येऊ द्या या मराठी कार्यक्रमातदेखील हजेरी लावली होती. 

Web Title: Jolly LLB 2 promotion in Akshay Kumar's life series

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.