खऱ्या आयुष्यात हा अभिनेता आहे इंजिनियर, पैसे कमावण्यासाठी करायचा फोटोग्राफी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 2, 2021 05:39 PM2021-06-02T17:39:58+5:302021-06-02T17:40:35+5:30

या अभिनेत्याने आजवर अनेक मालिकांमध्ये छोट्या-मोठ्या भूमिका साकारल्या आहेत. तो पहिल्यांदाच एका मालिकेत मुख्य भूमिकेत दिसणार आहे.

jeev majha guntala saurabh chaugule is engineer in real life | खऱ्या आयुष्यात हा अभिनेता आहे इंजिनियर, पैसे कमावण्यासाठी करायचा फोटोग्राफी

खऱ्या आयुष्यात हा अभिनेता आहे इंजिनियर, पैसे कमावण्यासाठी करायचा फोटोग्राफी

googlenewsNext
ठळक मुद्देडॉक्टर असो इंजिनियर किंवा मग कोणतंही वेगळं प्रोफेशन या कलेची साधना हे सवड आणि मार्ग शोधतेच, असाच कलाकार म्हणजे सौरभ चौगुले.

रंगभूमीने अनेक कलाकारांना घडवलं त्यांना मार्गदर्शन केलं आणि आज हेच कलाकार मनोरंजन सृष्टीत चांगलं नाव कमवत आहे. डॉक्टर असो इंजिनियर किंवा मग कोणतंही वेगळं प्रोफेशन या कलेची साधना हे सवड आणि मार्ग शोधतेच, असाच कलाकार म्हणजे सौरभ चौगुले. 

आपल्या भेटीला लवकरच येणारी 'जीव माझा गुंतला' या नवीन मालिकेतून सौरभ चौगुले हा अभिनेता मुख्य भूमिकेत आपल्याला दिसणार आहे. सौरभ हा इंजिनियर असून स्वतःमधल्या अभिनेत्याला ओळखून त्याने वेळीच आपला कल अभिनयाकडे वळवला. इंजिनियर केल्यानंतर अभिनयाकडे वळणं त्याच्यासाठी सोपं नव्हतं. त्याने अभिनयाची सुरुवात एकांकिकापासून केली. डोंबिवली आणि परिसरातील अनेक नाट्यसंस्थासोबत स्वतःला जोडून घेत त्याने आपल्या रंगभूमीच्या प्रवासाची सुरुवात केली. एकांकिका प्रायोगिक नाटक, राज्य नाट्य संस्था या सगळ्या माध्यमातून तो रंगभूमीशी एकरूप होत होता. अभिनयासोबतच त्याने फोटोग्राफी आणि सिनेमॅटोग्राफीचं योग्य तंत्र जाणून घेतलं. 

अभिनय करताना सातत्याने काम नसल्यामुळे अनेकदा आर्थिक अडचणींना त्याला सामोरं जावं लागलं. अशा वेळी त्याला फोटोग्राफी आणि सिनेमॅटोग्राफीचा चांगला फायदा झाला. तो अनेक शॉर्टफिल्म आणि वेबसिरीज यांचं छायाचित्रण करू लागला. हे काम करून येणारा मोबदला त्याच्या आर्थिक अडचणी दूर करत. पण या कामासोबतच त्याने आपल्या अभिनयाची कारकीर्द सुरूच ठेवली होती. मालिका आणि चित्रपटातून छोटी पात्र तो साकारत होता. अशातच त्याला दक्खनचा राजा ज्योतिबा या मालिकेत नकारात्मक पात्र साकारायला मिळालं. आता पुन्हा या लॉकडाऊनच्या प्रदीर्घ सुट्टीनंतर सौरभ 'जीव माझा गुंतला' या एका वेगळ्या विषयाला हात घालणाऱ्या मालिकेतून आपल्या भेटीला येत आहे. या मालिकेत तो 'मल्हार' ही भूमिका साकारत आहे. 

या मालिकेत तो योगिता चव्हाण या अभिनेत्री सोबत दिसणार असून मालिकेचा विषय हा स्त्री प्रधान आहे. 

Web Title: jeev majha guntala saurabh chaugule is engineer in real life

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.