जॅकलिन फर्नांडिसने आजारपणात ही पूर्ण केली कामाची कमिटमेंट

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 24, 2018 16:03 IST2018-05-24T10:33:38+5:302018-05-24T16:03:38+5:30

येत्या 27 मे रोजी होत असलेल्या ‘आयपीएल क्रिकेट स्पर्धे’च्या अंतिम सामन्यापूर्वी दोन तास ‘स्टार प्लस’ वाहिनीवर होत असलेल्या ‘क्रिकेट फायनल ...

Jacqueline Fernandez completes this work in sickness | जॅकलिन फर्नांडिसने आजारपणात ही पूर्ण केली कामाची कमिटमेंट

जॅकलिन फर्नांडिसने आजारपणात ही पूर्ण केली कामाची कमिटमेंट

त्या 27 मे रोजी होत असलेल्या ‘आयपीएल क्रिकेट स्पर्धे’च्या अंतिम सामन्यापूर्वी दोन तास ‘स्टार प्लस’ वाहिनीवर होत असलेल्या ‘क्रिकेट फायनल पार्टी तो बनती है’ या विशेष कार्यक्रमाच्या चित्रीकरणासाठी नामवंत अभिनेत्री जॅकेलिन फर्नांडिस उपस्थित होती. जॅकेलिनची तब्येत तेव्हा ठिक नसल्यामुळे चित्रीकरणापूर्वी ती काही तास आपल्या व्हॅनिटी व्हॅनमध्ये आराम करीत
होती.  यासंदर्भात एका सूत्राने सांगितले, “चित्रीकरणाच्या दिवशी जॅकेलिनची तब्येत बिघडली होती आणि सकाळपासून तिला बऱ्याच उलट्या झाल्या होत्या. ती सेटवर वेळेवर पोहोचली खरी, पण तिच्या अंगात उभं राहण्याचीही शक्ती नसल्याने ती व्हॅनिटी व्हॅनमध्ये आराम करीत होती. तब्बल दोन तासांनंतर ती सेटवर आली आणि तिने आपला शॉट पूर्ण उत्साहात आणि जोशपूर्ण पध्दतीने पूर्ण केला.”

जॅकेलिनला उन्हाच्या तापाचा त्रास होत होता आणि अशा स्थितीत संबंधित रुग्णाला पूर्ण दिवस आराम करण्यास सांगण्यात येते. पण तिने या कार्यक्रमात सहभागी होण्याचा शब्द दिले होता, त्यामुळे तिने आपल्या प्रकृतीबद्दल कोणाला माहिती दिली नाही आणि त्या स्थितीतही आपले चित्रीकरण पूर्ण केले.

ALSO READ :  सिद्धार्थ मल्होत्रा आणि जॅकलिन फर्नांडिसवर का आली नवं घर शोधण्याची वेळ ?

जॅकलिन आपल्याला लवकरच सलमान खानच्या 'रेस३' चित्रपटातय यात अनिल कपूर, डेजी शाह, बॉबी देओल आणि साकिब सलीम यांच्या प्रमुख भूमिका आहेत.'रेस-३’ हा एक अ‍ॅक्शन थ्रिलर चित्रपट आहे, ‘रेस3’मध्ये सलमान पहिल्यांदा निगेटीव्ह कॅरेक्टरमध्ये दिसेल. रेस-३’ १५ जून रोजी ईदनिमित्त प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट रेस फ्रेंचाइजीचा तिसरा भाग आहे. काही दिवसांपूर्वी ‘रेस-३’च्या शूटिंगसाठी सलमान आणि जॅकलिन सोनमर्गला गेले होते. सोनमर्ग या निसर्गरम्यस्थळी या दोन्ही स्टार्सवर एक रोमॅण्टिक गीत शूट केले गेले. सोनाक्षी सिन्हाही यात कॅमिओ रोलमध्ये दिसेल. 

Web Title: Jacqueline Fernandez completes this work in sickness

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.