It's confirmed! ​सुनील ग्रोव्हर, अली असगर, चंदन प्रभाकर यांनी सोडला द कपिल शर्मा शो

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 24, 2017 14:00 IST2017-04-24T08:30:15+5:302017-04-24T14:00:15+5:30

द कपिल शर्मा शो हा कार्यक्रम प्रेक्षकांचा प्रचंड आवडता आहे. या मालिकेने नुकतेच 100 भाग पूर्ण केले. त्यावेळी या ...

It's confirmed! Sunil Grover, Ali Asghar, Chandan Prabhakar leave the Kapil Sharma show | It's confirmed! ​सुनील ग्रोव्हर, अली असगर, चंदन प्रभाकर यांनी सोडला द कपिल शर्मा शो

It's confirmed! ​सुनील ग्रोव्हर, अली असगर, चंदन प्रभाकर यांनी सोडला द कपिल शर्मा शो

कपिल शर्मा शो हा कार्यक्रम प्रेक्षकांचा प्रचंड आवडता आहे. या मालिकेने नुकतेच 100 भाग पूर्ण केले. त्यावेळी या मालिकेच्या टीमने केक कापून आणि अनेक गाण्यांवर नृत्य सादर करत आपला आनंद व्यक्त केला. 
कपिल शर्मा शोला गेल्या महिन्यापर्यंत खूपच चांगला टिआरपी होता. पण गेल्या महिन्यात सिडनीवरून मुंबईला परतत असताना कपिलने सुनीलला विमानात शिव्या घातल्या आणि त्याला चप्पलेने चोपले. कपिल त्यावेळात प्रचंड दारूच्या नशेत होता. त्याने इतर सहकलाकारांनादेखील अपशब्द वापरले. त्यामुळे सुनील ग्रोव्हर, चंदन प्रभाकर आणि अली असगर यांनी या कार्यक्रमाला रामराम ठोकला असल्याचे म्हटले जात होते. पण आता कपिलच्या टीममधील अनेकांनी हा कार्यक्रम सोडला असल्याचे कपिलने स्वतः स्पष्ट केले आहे. 
सुनील, अली आणि चंदन या तिघांनी कार्यक्रम सोडल्यापासून या कार्यक्रमाचा टीआरपी दिवसेंदिवस ढासळत चालला आहे. त्यामुळे या कार्यक्रमाचा टीआरपी कसा वाढवायचा याचे कार्यक्रमाच्या टीमला आणि सोनी वाहिनीला टेन्शन आले आहे. या कार्यक्रमातील सुमोना चक्रवर्ती आणि उपासना सिंग गेल्या कित्येक दिवसांपासून या कार्यक्रमाचे चित्रीकरण करत नव्हते. पण आता त्यांना कपिलने आपल्या टीममध्ये परत आणले आहे. पण याचादेखील टिआरपीवर काहीही परिणाम झालेला नाहीये.
सुनील, अली आणि चंदन यांना त्यांचे फॅन खूप मिस करत आहेत. सुनीलने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत सांगितले आहे की, द कपिल शर्मा शोचे त्याने 92 भाग केले. हे भाग करताना खूप मजा आली. त्याला मिळालेल्या या प्लॅटफॉर्मसाठी तो नेहमीच आभारी असेन. 
100 भाग पूर्ण झाल्याबद्दल कपिल शर्मानेदेखील नुकताच एक व्हिडिओ फेसबुकला पोस्ट केला आहे आणि त्यात त्याच्या फॅन्सचे आभार मानले आहेत. तसेच त्याने त्यात स्पष्ट म्हटले आहे की, 100 भागांसाठी मी माझ्या फॅन्सचे आभार मानतो. तसेच आजची माझी टीम आणि ज्यांनी माझी साथ सोडली आहे त्यांचेदेखील मी आभार मानतो. 
कपिलच्या या व्हिडिओवरून अनेकांनी कपिल शर्मा शो हा कार्यक्रम सोडला असल्याचे स्पष्ट झाले आहे. 

Web Title: It's confirmed! Sunil Grover, Ali Asghar, Chandan Prabhakar leave the Kapil Sharma show

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.