Its confirmed, दिया और बाती या मालिकेचा नवा सीझन येणार, तू सूरज मैं सांज पिया जी या नावाने येणार सिक्वेल !

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2017 22:11 IST2017-02-19T16:41:58+5:302017-02-19T22:11:58+5:30

छोट्या पडद्यावर गाजलेल्या दिया और बाती या मालिकेच्या चाहत्यांसाठी आम्ही एक खास आणि तितकीच एक्स्क्लुझिव्ह बातमी घेऊन आलोय ती ...

Its confirmed, given and new season of wick will come, you will be known as sunaj i sang piya ji sequel! | Its confirmed, दिया और बाती या मालिकेचा नवा सीझन येणार, तू सूरज मैं सांज पिया जी या नावाने येणार सिक्वेल !

Its confirmed, दिया और बाती या मालिकेचा नवा सीझन येणार, तू सूरज मैं सांज पिया जी या नावाने येणार सिक्वेल !

ट्या पडद्यावर गाजलेल्या दिया और बाती या मालिकेच्या चाहत्यांसाठी आम्ही एक खास आणि तितकीच एक्स्क्लुझिव्ह बातमी घेऊन आलोय ती म्हणजे ही मालिका नव्या ढंगात आणि नव्या रुपात तुमच्या भेटीला येत आहे. ‘तू सूरज मैं सांज पिया जी’ या नावाने या मालिकेचा सिक्वेल लवकरच रसिकांच्या भेटीला येणार आहे. निसर्गरम्य केरळच्या कोच्चीमधील एका रिसॉर्टमध्ये दिया और बातीच्या नव्या सीझनची घोषणा करण्यात आली. यावेळी दिया और बाती मालिकेतील रसिकांची आवडती व्यक्तीरेखा ‘भाभो’ अर्थात अभिनेत्री नीलू वाघेला हिने बोटीतून एंट्री घेत नव्या सीझनच्या घोषणेसाठी वातावरण निर्मिती केली. दिया और बाती मालिकेच्या नव्या पर्वात रसिकांना अनेक नव्या गोष्टी पाहायला मिळतील. यापैकी प्रमुख एक बदल म्हणजे मालिकेचा बॅकड्रॉप. आधीच्या सीझनमध्ये या मालिकेची कथा ही राजस्थानवर आधारित होती. मात्र नव्या सीझनमध्ये मालिकेचा बॅकड्रॉप बदलला असून आता या मालिकेची कथा निसर्गसुंदर अशा केरळमध्ये रंगणार आहे. मालिकेचे शुटिंगही केरळमध्येच होणार आहे. त्यामुळेच नव्या सीझनची घोषणा करण्यासाठी निर्मात्यांनी केरळला पसंती दिली. याशिवाय या मालिकेत आधीच्या सीझनमध्ये संध्या आणि सूरज ही भूमिका साकारणारे दीपिका सिंह तसंच अनस रशीद रसिकांना पाहायला मिळणार नाहीत. त्यांची जागा कोण घेणार याची बातमीही आम्ही तुम्हाला लवकरच देणार आहोत. 

दिया और बाती हम ही मालिका 2011 साली छोट्या पडद्यावर दाखल झाली. अल्पावधीतच दिया और बाती हम या मालिकेने रसिकांच्या मनात अढळ स्थान मिळवलं होतं. या मालिकेत अभिनेत्री दीपिका सिंह हिने संध्या आणि अभिनेता अनस रशीद याने सूरज ही भूमिका साकारली होती. रसिकांना दीपिका आणि अनसची ही जोडी चांगलीच भावली. राजस्थानच्या बॅकड्रॉपवर रंगणा-या दिया और बाती मालिकेने रेटिंगमध्येही सातत्य ठेवलं होतं. त्यामुळे छोट्या पडद्यावरील हिट मालिका म्हणून या मालिकेची गणना होऊ लागली. गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यात दिया और बाती या मालिकेने रसिकांचा निरोप घेतला. यांत सूरज आणि संध्याचा मृत्यू दाखवण्यात आला होता. मालिकेने छोट्या पडद्यावरुन अचानक एक्झिट घेतल्याने रसिकांमध्ये काहीशी नाराजी होती. मात्र काही दिवसांतच मालिका परत सुरु होणार असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. आता ‘तू सूरज मैं सांज पिया जी’ या दिया और बाती हम या मालिकेच्या सिक्वेलच्या घोषणेमुळे रसिकांची प्रतीक्षा संपली आहे.

Web Title: Its confirmed, given and new season of wick will come, you will be known as sunaj i sang piya ji sequel!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.