​परदेस में है मेरा दिलच्या सेटवर दृष्टी धामी असा घालवते तिचा वेळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 17, 2017 16:40 IST2017-01-17T16:40:44+5:302017-01-17T16:40:44+5:30

मालिकांचे चित्रीकरण म्हटले की, दिवसातील 12-14 तास तरी सेटवरच जातात. त्यातही प्रत्येक कलाकाराचे चित्रीकरण सतत असेलच असे नाही. त्यामुळे ...

It is in my pocket that my heart is set on vision, its time | ​परदेस में है मेरा दिलच्या सेटवर दृष्टी धामी असा घालवते तिचा वेळ

​परदेस में है मेरा दिलच्या सेटवर दृष्टी धामी असा घालवते तिचा वेळ

लिकांचे चित्रीकरण म्हटले की, दिवसातील 12-14 तास तरी सेटवरच जातात. त्यातही प्रत्येक कलाकाराचे चित्रीकरण सतत असेलच असे नाही. त्यामुळे सेटवर संपूर्ण दिवस कसा घालवायचा हेच या कलाकारांना कळत नाही. काहीजण चित्रीकरणादरम्यान मिळणाऱ्या वेळेत आपल्या सहकलाकारांसोबत गप्पा मारत बसतात तर काही जण सेटवरच झोपतात. पण परदस में है मेरा दिल या मालिकेत नैनाची प्रमुख भूमिका साकारणारी दृष्टी धामी सेटवर खूपच चांगल्याप्रकारे वेळ घालवताना पाहायला मिळते. 
दृष्टी वेळ मिळेल तेव्हा सेटवर चित्र रंगवताना दिसते. आपल्या मोकळ्या वेळेचा सदुपयोग केला पाहिजे असे तिचे म्हणणे आहे. ती सेटवर सहकलाकारांशी गप्पा मारत न बसता किंवा डुलक्या न काढता चित्रे रंगवण्यात मग्न असते. आपल्या लहानपणीच्या दिवसांच्या स्मृती जागवण्यासाठी ती चित्रे रंगवत असते असेही सांगते. 
दृष्टी काही खूप चांगली चित्रकार नाही. पण तिला चित्र रंगवण्याची प्रचंड आवड आहे. याबाबत दृष्टी सांगते, "मला लहानपणापासूनच चित्र रंगवायला खूप आवडतात. मी काही खूप चांगली चित्रकार नाही. पण केवळ आवड म्हणून मी चित्र रंगवते. सेटवर मालिकेच्या कर्मचाऱ्यांना भांडी रंगवण्यातही मी मदत करते. ताणतणाव दूर करण्यासाठी कोणाला स्विमिंग करायला आवडते तर कोणाला ड्रायव्हिंग करायला आवडते. मी खूप स्ट्रेसमध्ये असेल तर रंगकाम करते. ते माझ्या टेन्शनवर एखाद्या औषधाप्रमाणे काम करते. रंग बघितले की, माझे मन प्रसन्न होते आणि मनावरचा ताण कुठल्या कुठे पळून जातो.  

Web Title: It is in my pocket that my heart is set on vision, its time

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.