Indian Idol 12: आता हद्द झाली... TRP साठी सवाई भट्टच्या तोंडून पुन्हा वदवून घेतलं 'खोटं'

By ऑनलाइन लोकमत | Published: April 26, 2021 11:19 AM2021-04-26T11:19:27+5:302021-04-26T11:32:13+5:30

Indian idol 12 sawai bhatt is not quitting show :सवाई भट शो (Sawai Bhatt) सोडून जाणार असा प्रोमो आऊट झाल्यावर त्याच्या चाहत्यांना धक्का बसला होता.

Indian idol 12 sawai bhatt is not quitting show all is trp drama fans angry on makers | Indian Idol 12: आता हद्द झाली... TRP साठी सवाई भट्टच्या तोंडून पुन्हा वदवून घेतलं 'खोटं'

Indian Idol 12: आता हद्द झाली... TRP साठी सवाई भट्टच्या तोंडून पुन्हा वदवून घेतलं 'खोटं'

googlenewsNext

सिंगिग रिएलिटी शो इंडियन आयडॉलचा १२वा (Indian Idol 12) सीझनने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजविले आहे. नुकतेच सवाई भट शो (Sawai Bhatt) सोडून जाणार असा प्रोमो आऊट झाल्यावर त्याच्या चाहत्यांना धक्का बसला होता.  यानंतर, चाहते आठवड्याच्या शेवटच्या भागाची आतुरतेने वाट पाहत होते. चाहत्यांना हे जाणून घ्यायचे होते की सवाई भट खरोखरच शो सोडून गेला की नाही? सवाई भटचे हे विधान देखील टीआरपी स्टंटशिवाय दुसरे काहीच नव्हते.

जयाप्रदा स्पेशल एपिसोडमध्ये सवाईने राजस्थानच्या 'घुमर' या लोकगीतावर अप्रतिम परफॉर्मन्स दिला. यानंतर शोच्या शेवटी तो स्टेजवर आला आणि म्हणाला, शो सोडून जायचे आहे आणि आपल्या आईसोबत रहायचे आहे. त्याची आई तीन चार महिन्यांपासून आजारी आहे. सवाईला शो सोडून जाऊ नये म्हणून हिमेशने त्याला समजावले आहे. यावर हिमेश म्हणाले की, कोट्यावधी लोकांनी तुझ्यासाठी व्होटिंग केलं आहे तुझ्याकडून त्यांना फार अपेक्षा आहेत. विशालही त्याला शो न सोडवण्याविषयी समजवतो.  

सगळ्यांचं बोलून ऐकून सवाई म्हणतो, "तुम्ही महान जजस आहात तुमच्या माध्यामातून देव बोलतोय असंच मी म्हणणे त्यामुळे हा शो न सोडून जाण्याचा निर्धार मी केला आहे. यानंतर सर्व स्पर्धक टाळ्या वाजवून सवाईचे स्वागत करतात. आता सोशल मीडियावर लोकांनी मेकर्सचा क्लास लावायला सुरुवात केली आहे. शोच्या टीआरपीसाठी मेकर्सनी सवाई भटची गरिबीचा पुन्हा एकदा वापर केला. हे आम्ही तर लोक बोलत आहेत. लोक म्हणतात की निर्मात्यांनी इंडियन आयडॉलला बिग बॉस बनवले आहे. लोकांनी शोमध्ये घडणारी  प्रत्येक गोष्ट स्क्रिप्टेड असल्याचे सांगितलं आहे. 

Web Title: Indian idol 12 sawai bhatt is not quitting show all is trp drama fans angry on makers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.