'छोट्या बयोची मोठ्ठी स्वप्नं' मालिकेत छोटी बयो आता होणार मोठी, बयोच्या भूमिकेत दिसणार ही अभिनेत्री

By ऑनलाइन लोकमत | Published: August 16, 2023 09:20 AM2023-08-16T09:20:39+5:302023-08-16T09:21:08+5:30

Chhotya Bayochi Mothi Swapna :'छोट्या बयोची मोठ्ठी स्वप्नं' ही मालिका आता बऱ्याच वर्षांची लीप घेत आहे. त्यामुळे मालिकेत एक नवे पर्व सुरू होणार आहे.

In 'Chhotya Biochi Motthi Swapnam' series, Chhotya Bio will now become big, this actress will play the role of Bio. | 'छोट्या बयोची मोठ्ठी स्वप्नं' मालिकेत छोटी बयो आता होणार मोठी, बयोच्या भूमिकेत दिसणार ही अभिनेत्री

'छोट्या बयोची मोठ्ठी स्वप्नं' मालिकेत छोटी बयो आता होणार मोठी, बयोच्या भूमिकेत दिसणार ही अभिनेत्री

googlenewsNext

सोनी मराठीवरील छोट्या बयोची मोठ्ठी स्वप्नं (Chhotya Bayochi Mothi Swapna) या मालिकेनं कमी कालावधीत रसिकांच्या मनात घर केले. ही मालिका आता बऱ्याच वर्षांची लीप घेत आहे. त्यामुळे मालिकेत एक नवे पर्व सुरू होणार आहे. येत्या २१ ऑगस्टपासून मालिकेचे हे नवीन पर्व प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. बयो आता तिचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी मुंबईत दाखल होणार आहे. इथे तिच्या वाट्यात कोणकोणती अडथळे येणार आणि त्यातून ती कसा मार्ग काढणार हे पाहणे रंजक ठरणार आहे. मालिकेत छोट्या बयोची भूमिका बालकलाकार रुची नेरुरकरने निभावली होती. छोट्या बयोला डॉक्टर बनायचं असतं त्यासाठी ती भरपूर मेहनत घेत असते अनेक अडथळे पार करत आता बयो मोठी झाली आहे. त्यामुळे आता मोठ्या बयोच्या भूमिकेत अभिनेत्री विजया बाबर दिसणार आहे. तिचा मालिकेतील लूक समोर आला आहे.

विजया बाबरने जय जय स्वामी समर्थ या मालिकेत चंदाची भूमिका केली होती. या भूमिकेतून तिला चांगलीच लोकप्रियता मिळाली आहे. काही महिन्यांपूर्वीच विजयाने जय जय स्वामी समर्थ मालिकेतून निरोप घेतला होता. त्यावेळी तिची बयोच्या भूमिकेसाठी निवड करण्यात आली होती. मालिकेला निरोप देताना लवकरच एका नव्या भूमिकेतून भेटेन असे तिने जाहीर केले होते. मात्र ही नवीन मालिका कोणती असणार हे तिने गुलदस्त्यात ठेवले होते. मात्र आता विजया पुन्हा एकदा प्रमुख भूमिकेत पाहायला मिळणार आहे.


गावात वाढलेली बयो आता मुंबईकडे धाव घेत आहे. इथे तिला डॉक्टरकीचे धडे गिरवताना सहकाऱ्यांकडूनच त्रास होणार आहे हे निश्चित आहे. हे आव्हान पेलण्यासाठी बयोला कोणाकोणाची साथ मिळते हेही पाहणे रंजक ठरणार आहे. 

Web Title: In 'Chhotya Biochi Motthi Swapnam' series, Chhotya Bio will now become big, this actress will play the role of Bio.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.