ये प्यार नहीं तो और क्या है या मालिकेत अंकित राज झळकणार या भूमिकेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 9, 2018 17:54 IST2018-03-09T12:24:38+5:302018-03-09T17:54:38+5:30

बडे अच्छे लगते है आणि एक दूजे के वास्तेचे निर्माते सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवर एक आगळी-वेगळी प्रेम कहाणी लवकरच घेऊन ...

If this love is not, then what is the role of the raj in this series? | ये प्यार नहीं तो और क्या है या मालिकेत अंकित राज झळकणार या भूमिकेत

ये प्यार नहीं तो और क्या है या मालिकेत अंकित राज झळकणार या भूमिकेत

े अच्छे लगते है आणि एक दूजे के वास्तेचे निर्माते सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवर एक आगळी-वेगळी प्रेम कहाणी लवकरच घेऊन येत आहेत. या मालिकेचे नाव ‘ये प्यार नहीं तो और क्या है’ असून ही आधुनिक काळातील एक ताजी टवटवीत प्रेम कहाणी आहे. मालिकेत मुख्य भूमिकांमध्ये प्रसिद्ध कलाकार असणार आहेत आणि त्यांच्यासोबत अंकित राज, कार्तिक रेड्डी हे देखील महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. अंकित राज या मालिकेत काम करण्यास उत्सुक आहे. तो लवकरच या मालिकेसाठी चित्रीकरण करायला सुरुवात करणार आहे. आपल्या भूमिकेला योग्य न्याय देण्यासाठी त्याने खूप अभ्यास केला आहे. भूमिका तिच्यातील बारकाव्यांनिशी केली पाहिजे असे त्याला वाटते आणि आपले काम चोखपणे करण्याचा त्याचा प्रयत्न असतो. भूमिका चांगली वठवण्यासाठी या प्रतिभाशाली कलावंताने भूमिकेच्या वेगवेगळ्या छटांचा सखोल अभ्यास केला आहे. एक श्रीमंत अहंकारी मुलगा ते प्रेमळ भाऊ या विविध छटा असलेल्या या पात्राच्या प्रेमात तो पडला आहे. अंकित तीन वर्षांपासून मालिकांमध्ये काम करत असून त्याच्या भूमिकांना नेहमीच प्रेक्षकांची पसंती मिळाली आहे. ‘ये प्यार नहीं तो और क्या है’ या मालिकेतील आपल्या भूमिकेविषयी अंकित राज सांगतो, “होय, मी ये प्यार नहीं तो और क्या है  मालिकेत काम करत आहे. ही एक आधुनिक काळातील प्रेमकथा आहे. या मालिकेमध्ये दाखवण्यात येणारी प्रेमकथा खूप वेगळी असल्याने मी ही मालिका स्वीकारली. माझी या मालिकेतील भूमिका खूप महत्त्वाची आहे आणि त्या भूमिकेबाबत मी उत्साही आहे. मालिकेचे कलाकार आणि इतर मंडळी खूप मदत करणारे असल्याने त्यांच्यासोबत काम करायला मजा येणार आहे. माझी व्यक्तिरेखा वैशिष्ट्यपूर्ण आहे. श्रीमंत घरातील मुलगा आणि एक प्रेमळ भाऊ अशी व्यक्तिरेखा मला या मालिकेत साकारायची आहे. मालिका लोकांना आवडेल अशी मी नक्कीच आशा व्यक्त करतो. या मालिकेबाबत आणि माझ्या भूमिकेविषयी माझ्या फॅन्सच्या असणाऱ्या प्रतिक्रिया ऐकण्यासाठी मी उत्सुक आहे.”

Web Title: If this love is not, then what is the role of the raj in this series?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.