हिंदी चित्रपट अभिनेत्री रेखा हीच माझी आदर्श नायिका रिया शर्मा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 21, 2018 14:49 IST2018-02-21T09:19:53+5:302018-02-21T14:49:53+5:30

आपल्या प्रत्येकाच्या मनात कोणीतरी व्यक्ती ही आदर्श असते.आपल्याला तिचे अनुकरण करावेसे वाटते.‘स्टार प्लस’वरील ‘तू सूरज,मैं साँझ पियाजी’ मालिकेत कनक ...

Hindi film actress Rekha Hich is my ideal heroine Riya Sharma | हिंदी चित्रपट अभिनेत्री रेखा हीच माझी आदर्श नायिका रिया शर्मा

हिंदी चित्रपट अभिनेत्री रेखा हीच माझी आदर्श नायिका रिया शर्मा

ल्या प्रत्येकाच्या मनात कोणीतरी व्यक्ती ही आदर्श असते.आपल्याला तिचे अनुकरण करावेसे वाटते.‘स्टार प्लस’वरील ‘तू सूरज,मैं साँझ पियाजी’ मालिकेत कनक या नायिकेची भूमिका साकारत असलेल्या रिया शर्माला तुझा आदर्श कोण विचारताच तिने बॉलिवूड दिवा रेखा यांचे नाव घेतले.याच खास कारण असल्याचे तिने सांगितले,त्याच्या अभिनयाच्या प्रेमात मीच काय अख्खं जग दिवान आहे.मात्र त्यांची चित्रपटसृष्टीमध्ये मला रेखाजी यांची स्टाईल जास्त आवडते.कारण आजवर त्यांची फॅशन आणि स्टाईल कधीही बदललेली नाही.तीस वर्षांपूर्वी त्या जशा दिसायच्या तशाच त्या आजही दिसतात.त्यांनी त्यांची स्वतःची अशी वेगळी स्टाईल कायम ठेवलीय. एखाद्या स्टाईलमध्ये तुम्ही किती कम्फर्टेबल आहात हे माझ्यासाठी खूप महत्त्वाचे आहे. कोणत्याही प्रकारची फॅशन ट्रेडिंग असेल आणि ती फॅशन मलाही आवडली असेल.मात्र जर मी त्यात कम्फर्टेबल नसेन तर मी तो ड्रेस घालणार नाही.ट्रेंड आणि फॅशनचा विचार न करता मला जे आवडेल तेच मी परिधान करेल.त्यामुळे रेखा यांच्या प्रमाणेच मी स्टाईल स्टेटमेंटचा विचार करते.


‘तू सूरज,मैं साँझ पियाजी’मालिकेच्या आगामी कथानकानुसार कनकला आता अधिक प्रगल्भ आणि समंजस दिसणे गरजेचे बनले आहे. त्यामुळे आपला लूक अशा परिपक्व व्यक्तीसारखा कसा करायचा, यावर चर्चा सुरू असताना रिया शर्माने वास्तव जीवनातील रेखाचे नाव घेतले आणि आपण त्यांच्यासारखे दिसलो पाहिजे, अशी सूचना केली.रिया शर्मा ही रेखाची जबरदस्त चाहती आहे. “मी रेखा मॅडमकडेच एक आदर्श नारी म्हणून पाहते आणि मला त्यांच्या भूमिकांमधूनच प्रेरणा मिळते, ही गोष्ट आता उघड झाली आहे. मी लहान असल्यापासून त्यांचे चित्रपट पाहात असून मला त्यांचा अभिनय आणि एकंदर वावर फार आवडतो. रेखा मॅडमनी आपल्या कारकीर्दीत जे नाव कमावलं आहे,त्याच्या एक टक्का जरी मी देवकृप्रेने प्राप्त करू शकले.तरी मी स्वत:ला धन्य समजेन,” असे  रिया म्हणाली.

‘तू सूरज, मैं साँझ पियाजी’ ही मालिका रसिकांचे मनोरंजन करण्यात चांगलीच यशस्वी ठरत आहे.या मालिकेचे नुकतेच चित्रीकरण बँकॉकमध्ये करण्यात आले. बँकॉकमध्ये मालिकेचे चित्रीकरण करण्याचा या मालिकेच्या टीमचा अनुभव खूपच चांगला होता. या मालिकेत अभिनेता अविनाश रेखी प्रेक्षकांना उमाशंकर या भूमिकेत पाहायला मिळत आहे. तसेच रिया शर्मा कनकची तर सादिया सिद्दिकी मासी सा ही भूमिका साकारत आहे. मासी साचे पितळ उघडे पाडून उमाशंकरचे निरपराधित्त्व सिद्ध करण्याच्या मोहिमेवर कनक, उमाशंकर बँकॉकला आले असल्याचे आपल्याला पाहायला मिळत आहे. 


Web Title: Hindi film actress Rekha Hich is my ideal heroine Riya Sharma

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.