तो चुकीच्या पद्धतीने स्पर्श करत होता,या टीव्ही अभिनेत्रीने केला धक्कादायक खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 4, 2018 12:45 IST2018-06-04T06:19:28+5:302018-06-04T12:45:12+5:30

गेल्या काही दिवसांत बलात्कार, विनयभंग आणि लैंगिक अत्याचाराच्या घटना दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात समोर येत असल्याचे पाहायला मिळत आहे.त्यामुळेच महिलांमध्ये ...

He was touching the wrong way, the TV actress did a shocking disclosure | तो चुकीच्या पद्धतीने स्पर्श करत होता,या टीव्ही अभिनेत्रीने केला धक्कादायक खुलासा

तो चुकीच्या पद्धतीने स्पर्श करत होता,या टीव्ही अभिनेत्रीने केला धक्कादायक खुलासा

ल्या काही दिवसांत बलात्कार, विनयभंग आणि लैंगिक अत्याचाराच्या घटना दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात समोर येत असल्याचे पाहायला मिळत आहे.त्यामुळेच महिलांमध्ये असुरक्षिततेची भावना वाढलीये.पण अशाही काही महिला आहेत ज्या गप्प न बसत त्यांच्याबरोबर घडलेला प्रकार उघडकीस आणल्याचे अनेक उदाहरणंही समोर येत आहेत.मग त्या अभिनेत्री असो किंवा मग आणखी दुस-या क्षेत्रात काम करणा-या महिला पुढे येऊन लैंगिक अत्याचाराविषयी गप्प न बसत जनजागृती करण्याचाही प्रयत्न करत आहेत.आता पुन्हा एकदा असाच एक किस्सा उघडकीस आला आहे.'इश्कबाज' मालिकेत मुख्य भूमिका साकारणारी श्रेणू पारेखन लहानपणी तिच्या बरोबर घडलेला एक धक्कादायक खुलासा केला आहे.पहिल्यांदाच तिने आपल्याबरोबर घडलेल्या तो किस्सा उघडकीस आणल्यामुळे सा-यांनाच धक्का बसला आहे.हा प्रसंग तिच्याबाबत तिच्या मूळ गावी घडला होता, एका गावक-याने तिची छेड काढण्याचा प्रयत्न केला होता.याबाबत श्रेणूने सांगितले,“लहान असताना मी सुटीत माझ्या आजोबांच्या गावी जात असे. एकदा आम्ही बसमधून जात असताना माझ्या आजोबांनी एका व्यक्तीला मला बसण्यासाठी थोडी जागा करून देण्याची विनंती केली. तेव्हा त्या माणसाने मला त्याच्या मांडीवर बसण्यास सांगितले.मला निदान बसायला मिळत आहे, हे बघून माझ्या आजोबांनी त्यास संमती दिली. मी त्याच्या मांडीवर बसल्या बसल्या डुलक्या घेऊ लागले.पण अचानक मला जाग आली, तेव्हा मला जाणवलं की तो माणूस मला चुकीच्यापद्धतीने स्पर्श करत होता. त्याचा स्पर्शाची मला जाणीव होताच मी तिथुन उठण्याचा प्रयत्नही केला. माझ्यापासून थोडेच दूर माझे नानू (आजोबा) उभे होते. पण त्यांना मला तेव्हा आणि नंतरही या घटनेबाबत काही सांगण्याचा धीर झाला नाही. पण मी तेव्हा बोलायला हवं होतं, असं मला आज वाटतं. कारण मी जर तेव्हा बोलले असते, तर सहा वर्षांच्या मुलीशी गैरवर्तन करणार्‍या त्या माणसाला काहीतरी शिक्षा झाली असती,असं मला आता वाटतं.”महिलांनी अशा प्रसंगी अजिबात भीती न बाळगता अशा प्रसंगांची जाहीर वाच्यता केली पाहिजे,म्हणजे एका महिलेला कोणत्या अवहेलनेला सामोरे जावे लागते, हे लोकांना समजेल तसेच बाल लैंगिक शोषण आणि मुलांच्या समस्यांबाबत जनजागृती अधिक होणे गरजेचे आहे.

Web Title: He was touching the wrong way, the TV actress did a shocking disclosure

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.