गुरू-शिष्य एकाच मालिकेत
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 15, 2016 13:40 IST2016-06-15T08:10:36+5:302016-06-15T13:40:36+5:30
रिश्तो को सौदागर - बाजीगर या मालिकेत वत्सल सेठ आणि ज्योती गुबा काम करत आहेत. वत्सल आणि ज्योती यांनी ...
.jpeg)
गुरू-शिष्य एकाच मालिकेत
र श्तो को सौदागर - बाजीगर या मालिकेत वत्सल सेठ आणि ज्योती गुबा काम करत आहेत. वत्सल आणि ज्योती यांनी याआधीही एक हसिना थी या मालिकेत काम केले आहे. हे दोघे सध्या एकमेकांचे सहकलाकार असले तरी खऱ्या आयुष्यात त्यांच्यात शिष्य आणि गुरूचे नाते आहे. ज्योती अभिनयक्षेत्रात येण्याआधी शिक्षिका होत्या आणि त्या वत्सलच्याच शाळेत शिकवत असत. वत्सल सांगतो, मी एक हसिना थी या मालिकेच्या सेटवर सगळ्यात पहिल्यांदा ज्योती यांना भेटलो. त्यावेळी त्यांनी मला ओळखले नव्हते. पण मी लगेचच त्यांना ओळखले आणि तुम्ही माझ्या टीचर होत्या असे त्यांना सांगितले. खरे तर त्या पूर्वी शिक्षिका होत्या हे सेटवर कोणालाच माहीत नव्हते. पण माझ्यामुळे त्यांचे हे गुपित सगळ्यांना कळले. तेव्हापासून आजपर्यंत आमचे दोघांचे ट्युनिंग खूपच चांगले आहे. आपल्याच टीचरसोबत काम करायला मिळणे हा वेगळाच आनंद असतो.