गोविंदांना भेटून गणेश झाला भावूक!
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 22, 2016 16:17 IST2016-08-22T10:47:48+5:302016-08-22T16:17:48+5:30
सुप्रसिद्ध कोरिओग्राफर आणि गायक गणेश हेगडे म्हणजे ज्येष्ठ अभिनेते गोविंदा यांचा भलामोठा चाहता. म्हणूनच ‘झलक दिखला जा9’च्या सेटवर गोविंदा ...

गोविंदांना भेटून गणेश झाला भावूक!
स प्रसिद्ध कोरिओग्राफर आणि गायक गणेश हेगडे म्हणजे ज्येष्ठ अभिनेते गोविंदा यांचा भलामोठा चाहता. म्हणूनच ‘झलक दिखला जा9’च्या सेटवर गोविंदा त्यांच्या आगामी चित्रपटाच्या प्रमोशनसाठी आले तेव्हा गणेशचा आनंद गगनात मावेनासा झाला. आपल्या सर्वांत आवडत्या सेलिब्रिटीला प्रत्यक्ष भेटण्याची संधी गणेशला मिळाली होती. याचा आनंद गणेशच्या चेहºयावर स्पष्टपणे दिसत होता. मायकल जॅक्शन हा गणेशचा आदर्श आहे, हे सर्वांनाच ठाऊक आहे. पण लहान असताना गणेशने सर्वांत पहिला आॅटोग्राफ कुणाचा घेतला असेल तर तो गोविंदा यांचा. गोविंदांबद्दल गणेश भरभरून बोलला. गोविंदा सरांचे चित्रपट आणि त्यांचा डान्स पाहूनच मी मोठा झालो आहे. गोविंदा सरांच्या गाण्यावरच मी माझा पहिला परफॉर्मन्स केला होता, अशा कितीतरी गोष्टी गणेशने सांगितल्या. यानंतर गोविंदा सरांसोबत डान्स तो बनता है... होय ना गणेश!!
![]()