‘जीजी माँ’च्या सेटवर कलाकारांना झाली दुखापत

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 23, 2018 13:44 IST2018-04-23T08:14:20+5:302018-04-23T13:44:20+5:30

तन्वी डोग्रा आणि दिशांक अरोरा हे ‘स्टार भारत’वरील ‘जीजी माँ’ मालिकेत प्रमुख भूमिका साकारणारे कलाकार अलीकडेच मालिकेतील तलावात उड्या ...

Gee ji mama set artists hurt | ‘जीजी माँ’च्या सेटवर कलाकारांना झाली दुखापत

‘जीजी माँ’च्या सेटवर कलाकारांना झाली दुखापत

्वी डोग्रा आणि दिशांक अरोरा हे ‘स्टार भारत’वरील ‘जीजी माँ’ मालिकेत प्रमुख भूमिका साकारणारे कलाकार अलीकडेच मालिकेतील तलावात उड्या मारण्याचा प्रसंग चित्रीत करीत होते. पण या पाण्यात क्लोरिन हे रसायन प्रमाणापेक्षा अधिक मिसळले गेल्याने तन्वी, दिशांक, एक तंत्रज्ञ आणि स्टंट कलाकार या सर्वांना भाजल्याच्या तीव्र जखमा झाल्या. या विचित्र आणि अनपेक्षित अपघातामुळे सार्‍या कलाकारांना धक्का बसला आहे.या अपघाताची माहिती देताना दिशांकने सांगितले, “माझा चेहरा आणि शरीराच्या वरच्या भागाला भाजल्याच्या तीव्र जखमा झाल्या आहेत.सध्या तरी माझी स्थिती तितकीशी चांगली नाही आणि यातून पूर्णपणे बरा होण्यास मला निदान एक महिना तरी लागेल.पाण्यात क्लोरिनचं प्रमाण अधिक असेल, तर त्यामुळे अशा भाजल्याच्या जखमा होऊ शकतात,याची मला अजिबात कल्पना नव्हती.सुदैवाने माझ्या डोळ्यांना कसलीही दुखापत झालेली नाही.तन्वीलाही माझ्यासारख्याच जखमा झाल्या आहेत.माझी अवस्था बघितल्यावर माझ्या आईला आपले अश्रू अनावर झाले होते.अर्थात आता माझ्या चेह-यावर या जखमा लवकरच सुधरतील अशी मी काळजी घेत आहे.माझ्या निर्मात्यांनी मला अतिशय सहकार्य केलं असून आम्ही जास्तीच्या भागांचं चित्रीकरणकरून ठेवलं आहे, ही त्यातल्या त्यात समाधानाची बाब आहे.”

अभिनय करणे प्रत्येक कलाकारसाठी आव्हानात्मक असेत.शेवटी  आपल्या आपल्या अभिनयातून रसिकांचे मनोरंजन होणे हेच महत्त्वाचे असते.प्रत्येक कलाकार आपापल्या अभिनयकौशल्याने रसिकांची मनं जिंकण्याचे प्रत्येकवेळी प्रयत्न करत असतो.त्यातही अनेक प्रकारच्या अभिनयगुणांनी परिपूर्ण असलेल्या या क्षेत्रात स्वत:चा ठसा उमटवणे हे तर अधिकच अवघड आहे.म्हणूनच ‘जीजी माँ’ मालिकेत उत्तरादेवीची भूमिका साकारत असलेली अभिनेत्री पल्लवी प्रधान हिचा रंगमंचावर काम केल्यानंतर  टीव्ही मालिकांकडे वळल्या.एकांकिका आणि नाटकांतून आपल्या अभिनयाच्या कारकीर्दीस प्रारंभ केलेल्या पल्लवी प्रधानला पहिल्या मानधनापोटी केवळ 75 रुपयांचा धनादेश मिळाला होता. तीन तासांच्या चित्रपटासाठी शेकडो रुपये मोजावे लागण्याच्या काळात केवळ 75 रुपयांवरून प्रारंभ करून रंगमंचाकडून रुपेरी पडद्याच्या दिशेने केलेला व्यावसायिक प्रवास आणि यादरम्यान कमावलेले नाव ही तिची मोठीच कमाई म्हणावी लागेल.पल्लवी प्रधान ही एक उत्तम अभिनेत्री असून तिनं फक्त मराठी रंगमंचच नाहीतर गुजराती रंगमंचही गाजवला. 

Web Title: Gee ji mama set artists hurt

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.