‘दिल ही तो है’ या मालिकेत गौतम आहुजा साकारणार ही भूमिका
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 22, 2018 12:25 IST2018-05-22T06:55:56+5:302018-05-22T12:25:56+5:30
एकता कपूर सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवर दिल ही तो है ही एक बहु प्रतिक्षित प्रेमकथा घेऊन येत आहे. बर्याच काळापासून ...

‘दिल ही तो है’ या मालिकेत गौतम आहुजा साकारणार ही भूमिका
ए ता कपूर सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवर दिल ही तो है ही एक बहु प्रतिक्षित प्रेमकथा घेऊन येत आहे. बर्याच काळापासून प्रेक्षकांमध्ये या मालिकेविषयी चर्चा सुरू आहे. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी मोठमोठे कलाकार घेण्यासाठी निर्माते प्रयत्न करत आहेत. करण कुंद्रा आणि योगिता बिहानी यामध्ये मुख्य भूमिका साकारत असून इतर कलाकारांबद्दल देखील बरीच चर्चा सुरू आहे. या कलाकारांच्या संचात आता लोकप्रिय अभिनेता गौतम आहुजा सामील होत आहे.
परवरिश, अदालत आणि एकता कपूरच्या इतर लोकप्रिय मालिकांमधून झळकलेल्या या बाल कलाकाराला आगामी प्रेम कथेत एक महत्त्वाची भूमिका साकारण्याची संधी मिळाली आहे. गौतम या मालिकेत नायकाच्या म्हणजेच करण कुंद्राच्या किशोरवयीन भावाची म्हणजे शिवमची भूमिका साकारणार आहे. या भूमिकेविषयी गौतम सांगतो, “पुन्हा एकदा बालाजी आणि सोनी टीव्ही सोबत काम करताना मला आनंद होत आहे. छोट्या पडद्यावर या मालिकेची चांगलीच चर्चा रंगली आहे. शिवम एक आनंदी आणि मस्तीत राहणारा मुलगा आहे. घरातील शेंडेफळ असल्यामुळे तो खूप लाडावलेला आहे, विशेषतः त्याचा मोठा भाऊ त्याचे खूप लाड करतो. मालिका लवकरच सुरू होत आहे आणि या नवीन प्रवासासाठी मी खूप उत्सुक आहे.”
कभी खुशी कभी गम या चित्रपटाची कथा आणि या चित्रपटातील सगळ्या कलाकारांचा अभिनय प्रेक्षकांना प्रचंड भावला होता. या चित्रपटात शाहरुख खान, काजोल, हृतिक रोशन, करिना कपूर, जया बच्चन आणि अमिताभ बच्चन यांसारखे कलाकार झळकले होते. कौटुंबिक मूल्याची शिकवण देणाऱ्या कभी खुशी कभी गम या चित्रपटाला प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतले होते. या चित्रपटाला आज अनेक वर्षं झाली असली तरी या चित्रपटाची लोकप्रियता थोडी देखील कमी झालेली नाही. करण जोहरने दिग्दर्शित केलेला कभी खुशी कभी गम प्रेक्षकांना आता मालिकेच्या रूपात पाहायला मिळणार आहे आणि या मालिकेची निर्मिती छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध निर्माती एकता कपूर करणार आहे. दिल ही तो है असे या मालिकेचे नाव असणार असून छोट्या पडद्यावरचे अनेक प्रसिद्ध कलाकार या मालिकेत झळकणार असल्याचे म्हटले जात आहे.
Also Read : ‘दिल ही तो है’ मालिकेतून पूनम ढिल्लोन करणार पुनरागमन