​गौहर खानचा प्रियकर रुपिन पहावा झळकणार एक विवाह ऐसा भी या मालिकेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2017 17:37 IST2017-01-13T17:37:53+5:302017-01-13T17:37:53+5:30

बिग बॉसच्या सातव्या पर्वाची गौहर खान विजेती ठरली होती. बिग बॉसच्या घरात असताना गौहर खानचे कुशल टंडनसोबत सूत जुळले ...

Gauhar Khan's lover, Rupin, will be seen as a wedding in this series | ​गौहर खानचा प्रियकर रुपिन पहावा झळकणार एक विवाह ऐसा भी या मालिकेत

​गौहर खानचा प्रियकर रुपिन पहावा झळकणार एक विवाह ऐसा भी या मालिकेत

ग बॉसच्या सातव्या पर्वाची गौहर खान विजेती ठरली होती. बिग बॉसच्या घरात असताना गौहर खानचे कुशल टंडनसोबत सूत जुळले होते. त्यांचे प्रेमप्रकरण त्यावेळी मीडियात प्रचंड गाजले होते. बिग बॉसच्या घरातून बाहेर आल्यावरही अनेक ठिकाणी त्यांना एकत्र पाहाण्यात आले होते. त्यामुळे ते लग्न करणार अशी चर्चा सर्वत्र सुरू होती. पण बिग बॉसनंतर काहीच दिवसात त्या दोघांनी आपल्या नात्याला पूर्णविराम दिला आणि आता तिच्या आयुष्यात कोणीतरी नवीन आले असल्याची चर्चा कित्येक दिवसांपासून सुरू आहे. गायक रुपिन पहवा आणि गौहर डेट करत असल्याचे म्हटले जात आहे. गौहरचा हा प्रियकर रुपिन एक गायक आणि अभिनेता आहे. रुपिन आता छोट्या पडद्यावर झळकणार आहे. 
एक विवाह ऐसा भी ही मालिका लवकरच सुरू होणार आहे. या मालिकेची कथा ही सध्याच्या मालिकांपेक्षा खूपच वेगळी आहे. काही परिस्थितीमुळे या मालिकेची नायिका आपल्या दोन सासवांसोबत राहायला लागते असे या मालिकेत दाखवण्यात आले आहे. या मालिकेत रुपिन एका प्रमुख भूमिकेत झळकणार आहे. याविषयी तो सांगतो, "मी दिल्लीत राहात असताना संगीतक्षेत्रात करियर करत होतो. पण त्याचवेळी मला अभिनयाचीदेखील आवड होती. त्यामुळे आपल्या या आवडीलादेखील प्रोत्साहन द्यावे असे मला वाटले. मी आता एक विवाह ऐसा भी या मालिकेत काम करणार आहे. या मालिकेची संकल्पना मला खूपच आवडली. या मालिकेतील माझे काम प्रेक्षकांना आवडेल अशी मला आशा आहे." 

Web Title: Gauhar Khan's lover, Rupin, will be seen as a wedding in this series

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.