गौहर खान आणि जैद दरबार 22 नोव्हेंबरला करणार का लग्न ?, अभिनेत्रीने सोडलं यावर मौनं
By गीतांजली | Updated: October 22, 2020 19:57 IST2020-10-22T19:50:39+5:302020-10-22T19:57:50+5:30
र खान आणि संगीतकार इस्माइल दरबार यांचा मुलगा जैदशी लग्न करणार अशी चर्चा आहे.

गौहर खान आणि जैद दरबार 22 नोव्हेंबरला करणार का लग्न ?, अभिनेत्रीने सोडलं यावर मौनं
अलीकडेच गौहर खान आणि संगीतकार इस्माइल दरबार यांचा मुलगा जैदशी लग्न करणार अशी चर्चा आहे. जैद आणि गौहर सोशल मीडियावर नेहमीच एकमेकांसोबतचे फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असतात. गौहर खान जैदपेक्षा मोठी आहे.
जैदचे वडील इस्माइल दरबार यांनी त्यांना गौहर सून म्हणून पसंत असल्याचे सांगितले होते. बिग बॉसच्या घरात जाण्यापूर्वी जैद गौहराला घेऊन त्यांना आणि आईला भेटायला घरी आला होता असा खुलासा इस्माइल दरबार यांनी केला होता. याच दरम्यान 22 नोव्हेंबरला गौहर आणि जैद लग्न करणार अशी माहिती समोर आली. यावर गौहर खानने आपलं मौनं सोडलं आहे. गौहरने लग्नाच्या बातम्यांना अफवा असल्याचे सांगितले आहे. तिने असे सांगितले की असे काही असल्यास ती स्वत: सांगेल.
इस्माईल दरबार यांनी दिला ग्रीन सिग्नल
असे म्हटले जाते की इस्माईल दरबार यांना आपला मुलगा जैद यांच्या निवडीवर काहीच आक्षेप नाही, परंतु त्यांनी आपल्या निर्णयाबद्दल काळजीपूर्वक विचार करण्याचा सल्ला आपल्या मुलाला दिला आहे. गौहर ही जैद पेक्षा मोठी आहे, याच गोष्टीमुळे वडिलांनी त्याला हा सल्ला दिला असावा. जैद हा अभिनेता, इफ्लूएंसर, कंटेट क्रिएटर आहे. सोशल मीडियावर त्याचे भरपूर फॉलोअर्स आहेत. तो एक प्रोफेशनल डान्सरही आहे