​गोठ या मालिकेने पूर्ण केली सेंच्युरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 21, 2017 18:22 IST2017-03-21T12:52:14+5:302017-03-21T18:22:14+5:30

गोठ ही मालिका सुरू होऊन काहीच महिने झाले आहेत. पण या मालिकेला अल्पावधीतच प्रेक्षकांची पसंती मिळाली आहे. या मालिकेतील ...

Frozen completed by the series The Century | ​गोठ या मालिकेने पूर्ण केली सेंच्युरी

​गोठ या मालिकेने पूर्ण केली सेंच्युरी

ठ ही मालिका सुरू होऊन काहीच महिने झाले आहेत. पण या मालिकेला अल्पावधीतच प्रेक्षकांची पसंती मिळाली आहे. या मालिकेतील कथानक प्रेक्षकांना खूप आवडत आहे. पण त्याचसोबत या मालिकेतील व्यक्तिरेखांनी प्रेक्षकांच्या मनात घर केले आहे. बयोआजी, राधा, विलास, नीला, अभय, दिप्ती, किशोर या सगळ्याच व्यक्तिरेखा प्रेक्षकांचे मन जिंकत आहेत. या मालिकेचे नुकतेच 100 भाग पूर्ण झाले. या मालिकेच्या टीमने हा आनंद केक कापून साजरा केला. त्यावेळी सेटवर मोठे सेलिब्रेशनदेखील करण्यात आले.
बयोआजी या मालिकेत नेहमी आपल्याला जुन्या परंपरा आणि रुढींचा पुरस्कार करताना दिसतात तर राधा ही आजच्या जगातील मुक्त विचार करणारी मुलगी आहे. त्यांच्या संघर्षाची कथा प्रेक्षकांना गोठ या मालिकेत पाहायला मिळत आहे. त्याचसोबत या कथेला एका जुन्या कौटुंबिक रहस्याची जोड आहे. त्यामुळेच काही अपरिहार्य कारणांमुळे राधा बयोआजीची सून म्हणून म्हापसेकरांच्या वाड्यात आली आहे. ही कथा सध्या प्रेक्षकांना प्रचंड भावत आहे. त्याचसोबत कोकणच्या पार्श्वभूमीवर रंगणारी कथा अनेक स्थानिक संदर्भ, चालीरिती, परंपरा, बदलत्या काळातले त्याचे संदर्भ नेमकेपणाने मांडत असल्याने प्रेक्षकांना ती अधिक आवडत आहे. 
गोठ या मालिकेत बयोआजीच्या भूमिकेत नीलकांती पाटेकर असून या मालिकेत त्यांच्यासोबत राजन भिसे, समीर परांजपे, रूपल नंद, सुशील इनामदार, विवेक गोरे, ऋता काळे, सुप्रिया विनोद, शलाका पवार, लतिका गोरे, विनायक भावे, नीलपरी गायकवाड, रूपाली मांगले यांच्या प्रमुख भूमिका आहेत. 
गोठ या मालिकेच्या कथानकासोबत या मालिकेचे शीर्षकगीतही प्रसिद्ध आहे. ते गुरू ठाकूर यांनी लिहिले असून आदर्श शिंदे यांनी ते गायले आहे तर निलेश मोहरीरने हे गाणे संगीतबद्ध केले आहे. 



Web Title: Frozen completed by the series The Century

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.