गोव्यात पोहोचलेल्या टीका, मलखान आणि टिल्लूने तरुणीशी केली फ्लर्टिंग, पाहा व्हिडीओ!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2018 15:39 IST2018-03-07T10:09:04+5:302018-03-07T15:39:11+5:30

सध्या ‘भाबीजी घर पर है’ची संपूर्ण टीम गोव्यात असून, त्याठिकाणी हे सर्व प्रचंड धमाल करताना बघावयास मिळत आहेत, त्याचा एक व्हिडीओ समोर आला आहे.

Flickering with Tony, Malkhan and Tilulu, who came to Goa, see the video! | गोव्यात पोहोचलेल्या टीका, मलखान आणि टिल्लूने तरुणीशी केली फ्लर्टिंग, पाहा व्हिडीओ!

गोव्यात पोहोचलेल्या टीका, मलखान आणि टिल्लूने तरुणीशी केली फ्लर्टिंग, पाहा व्हिडीओ!

ाबीजी घर पर है’ या अत्यंत लोकप्रिय टीव्ही मालिकेचा सध्या स्पेशल एपिसोड सुरू आहे. या आठवड्यात मालिकेची संपूर्ण टीम गोवा येथे पोहोचलेली आहे. अंगुरी भाभीसह मालिकेतील सर्वच पात्र सध्या गोव्यात मस्ती करताना बघावयास मिळत आहे. ज्याठिकाणी भाबीजी आपल्या नवनव्या लूकमुळे तिच्या चाहत्यांना प्रभावित करीत आहे, तर दुसरीकडे टीकाराम, मलखान आणि टिल्लूदेखील गोव्याच्या रंगांत रंगताना दिसून येत आहेत. ५ मार्चपासून सुरू झालेला गोवा स्पेशल एपिसोड ९ मार्चपर्यंत चालणार आहे. ज्यामध्ये सर्व पात्र जबरदस्त धमाल करताना बघावयास मिळणार आहेत. अ‍ॅण्ड टीव्हीच्या आॅफिशियल ट्विटर अकाउंटवर एक व्हिडीओ शेअर करण्यात आला असून, त्यामध्ये टीकाराम, मलखान आणि टिल्लू चक्क एका तरुणीसोबत फ्लर्टिंग करताना बघावयास मिळत आहेत. 

गोव्यात मस्ती करताना तिघांची गाठ एका तरुणीशी पडते. तिघेही या तरुणीला इम्प्रेस करण्यासाठी वाट्टेल ते प्रयत्न करताना दिसतात. त्या तरुणीला इंट्रोड्यूस करताना टिल्लू सर्वात अगोदर आपल्या तोडक्या इंग्रजीत तिच्यावर इम्प्रेशन मारण्याचा प्रयत्न करतो. ‘आई टिल्लू, आई डू वर्क इन शॉप कच्छा बनियान... एंड यू नो, सेठ वेरी कंजूस बट आय टुक मनी फ्रॉम गल्ला... सो हल्ला-हल्ला, बोल हल्ला... आय लाइक यू वेरी मच’ टिल्लूची ही भन्नाट इंग्रजी संपत नाही तोच मलखान मध्येच टिल्लूपेक्षा आपली भन्नाट इंग्रजी बोलायला लागतो. ‘मायसेल्फ मलखान, आई ड्रिंग टी एव्रीडे आॅन गुप्ता स्टॉल एंड आई वाच गर्ल एव्रीडे लाइक टीवी.’
 }}}} ">Aise to bhai koi ladki nahi pat sakti! Tag your friends, jinki aapko yeh video dekh kar yaad aayi! Dekhiye #BhabiJi Ghar Par Hain Goa Special, aaj raat 10:30 baje &TV par. #BhabiJiGoaSpecial#KanpurToGoapic.twitter.com/RtggBY1hbB— &TV (@AndTVOfficial) March 6, 2018
दोघांचे प्रयत्न सुरू असतानाच टीकालाही स्वत:वर कंट्रोल ठेवणे अवघड होते. तो चक्क त्या तरुणीच्या हाताला किस करताना म्हणतो की, ‘माई नेम इस टीकाराम, सारे लडके मेरे सामने फिकाराम...’ अशा मस्तीच्या अंदाजात हे तिघेही त्या मुलीसोबत फ्लर्ट करताना दिसतात. हे तिघेही गोव्यात टी-शर्ट, कॅपरी, कॅप आणि काळा चष्मा घालून बिचवर भडकताना दिसतात. तिघांमधील मस्ती बघण्यासारखी आहे. 

Web Title: Flickering with Tony, Malkhan and Tilulu, who came to Goa, see the video!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.