अखेर तो क्षण आला, ‘हर मर्द का दर्द’ मालिका घेणार प्रेक्षकांचा निरोप!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 6, 2017 16:49 IST2017-07-06T11:19:09+5:302017-07-06T16:49:09+5:30

आपल्या शिणलेल्या मनाला हलकाफुलका विरंगुळा देणारी ‘हर मर्द का दर्द’ ही मालिका जुलैमध्ये प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. समाजातील प्रत्येक ...

Finally the moment came, the audience will take a series of 'every man's pain'! | अखेर तो क्षण आला, ‘हर मर्द का दर्द’ मालिका घेणार प्रेक्षकांचा निरोप!

अखेर तो क्षण आला, ‘हर मर्द का दर्द’ मालिका घेणार प्रेक्षकांचा निरोप!

ल्या शिणलेल्या मनाला हलकाफुलका विरंगुळा देणारी ‘हर मर्द का दर्द’ ही मालिका जुलैमध्ये प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. समाजातील प्रत्येक पुरुषापुढील समस्येला विनोदी ढंगात सादर करणारी आणि अगदी वैशिष्ट्य़पूर्ण कथानक असलेली ही मालिका आता 14 जुलै रोजी प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. ही एक मर्यादित भागांची संकल्पना असलेली मालिका होती आणि तिचा शेवट सुखद होणार आहे.या मालिकेचा अनुभवाविषयी मालिकेत नायिकेची भूमिका साकारणारी अभिनेत्री झिनल बेलाणी म्हणाली, “हो, ही मालिका 14 जुलै रोजी प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. या मालिकेच्या निमित्ताने फैझल रशीद आणि इतर कलाकारांबरोबर काम करण्याचा अनुभव खास होता.”तिची सह-कलाकार वैशाली ठक्कर म्हणाली, “निरोपाचा संदेश हा एक नवा प्रारंभ असतो. आम्ही या मालिकेची सांगता जल्लोषात करणार असून सोबत अनेक संस्मरणीय क्षण आणि अनुभव घेऊन जाणार आहोत.” आता या मालिकेतील कलाकार आपल्या अखेरच्या भागाचे चित्रीकरण करण्यात आणि निरोपाच्या पार्टीची तयारी करण्यात मग्न असल्याचे सूत्रांनी संगितले.

'सुमित संभाल लेगा’ या मालिकेनंतर परमित सेठीने ही 'हर मर्द का दर्द' ही मालिका दिग्दर्शित केली होती.परमीतने 'दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे', 'दिलजले' यांसारख्या चित्रपटांमध्ये महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. अभिनयानंतर परमीत काही वर्षांपूर्वी दिग्दर्शनाकडे वळला. त्याने 'बदमाश कंपनी' या चित्रपटाचे दिग्दर्शन केले होते. कोणत्याही स्त्रीला समजून घेणे हे कठीणच नव्हे तर अशक्य असते असे म्हटले जाते. स्त्रियांना नेमके हवे आहे तरी काय हा प्रश्न सगळ्याच पुरुषांना पडतो. याच प्रश्नांभोवती गुंफलेली हर मर्द का दर्द ही मालिका होती.

Web Title: Finally the moment came, the audience will take a series of 'every man's pain'!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.