Fat to Fit:‘साम दाम दंड भेद’मधील भानू उदयचा प्रवास

By ऑनलाइन लोकमत | Published: October 12, 2017 12:22 PM2017-10-12T12:22:59+5:302017-10-12T17:52:59+5:30

प्रत्येक सिनेमा किंवा मालिकेत भूमिकेसाठी  कलाकार पिळदार बॉडी कमावण्यासाठी  बरीच मेहनत घेत असतात. वजन कमी करण्यासाठी दररोज 6-7 तास ...

Fat to Fit: Journey of Bhanu rising in 'Samastra Penal fine' | Fat to Fit:‘साम दाम दंड भेद’मधील भानू उदयचा प्रवास

Fat to Fit:‘साम दाम दंड भेद’मधील भानू उदयचा प्रवास

googlenewsNext
रत्येक सिनेमा किंवा मालिकेत भूमिकेसाठी  कलाकार पिळदार बॉडी कमावण्यासाठी  बरीच मेहनत घेत असतात. वजन कमी करण्यासाठी दररोज 6-7 तास तो हे कलाकार मंडळी वर्कआऊट करतात.त्यामुळे त्यांचा लूकही खूप आकर्षक दिसतो. कधी सिनेमासाठी तरी कधी प्रत्यक्ष आयुष्यात हे सेलब्रिटींनी हेल्दी डायट आणि कठीण वर्कआउट करुन आपले वजन कमी केले आहे.मात्र आपला लठ्ठपणा कमी करत पिळदार बॉडी कमावणं हे खूप कठिण असून काही कलाकारांना मात्र हे काही आठवड्यांतच शक्य होतं.

एखाद्या व्यक्तिरेखेच्या अंतरंगात शिरून ती वास्तववादी साकारण्यासाठी अलीकडे कलाकार सर्व चाकोर्‍्या मोडताना दिसतात.  ‘साम दाम दंड भेद’ मालिकेत विजय नामधारीची भूमिका साकारणारा भानू उदय हा असाच एक कलाकार असून त्याने या भूमिकेसाठी अनेकदा आपले वजन प्रचंड प्रमाणात वाढविले आणि ते पुन्हा नेहमीच्या पातळीवर आणले.सूत्रानुसार, मालिकेच्या दिग्दर्शकांनी सुरुवातीला भानूला आपले वजन वाढविण्याची सूचना केली होती. त्यानुसार भानूने आपल्या आहारात बदल करून आपले वजन वाढविले. वजन वाढण्यात काही अडचण आली नाही, परंतु अगदी अल्प काळात इतक्या प्रमाणात वजन वाढविण्याचा त्रास झाला. अशा त-हेने वजन वाढविणे हे आरोग्यास हानिकारक असते. परंतु भानूला ही भूमिका मनापासून आवडल्याने त्याने हा त्रास सहन केला.परंतु त्यानंतर पटकथेत काही बदल करण्यात आले आणि भानूला 25 वर्षांच्या तरुणाची भूमिका साकारण्यास सांगण्यात आले. त्यामुळे त्याला हे वाढलेले वजन कमी करणे भाग होते. पण भानूने नियमित व्यायाम आणि आहारावरील कठोर निर्बंधांद्वारे आपले वाढलेले वजन घटवून आपली अंगयष्टी एखाद्या 25 वर्षीय तरुणाइतकी सडपातळ केली. आपल्या या वजन वाढविणे-घटविण्याच्या प्रयोगाबाबत भानू उदय म्हणाला, “व्यक्तिरेखेसाठी प्रयोग करण्याची माझी नेहमीच तयारी असते आणि ती व्यक्तिरेखा वास्तव दिसावी, असा माझा प्रयत्न असतो. ही मालिका मला अत्यंत प्रिय असून त्यातील भूमिकेसाठी मी कितीही टोकाला जाऊ शकतो. विजय नामधारी या व्यक्तिरेखेसाठी माझा सडपातळ-स्थूल ते पुन्हा सडपातळ होण्याचा प्रवास माझ्या नेहमीच लक्षात राहील. प्रेक्षकांना ही मालिका आणि माझी व्यक्तिरेखा जोवर आवडत आहे, तोपर्यंत माझ्या सा-या मेहनतीचं चीज झालं, असं मी मानतो.”पटकथेनुसार आपल्या व्यक्तिमत्त्वात बदल घडवून आपल्या दिग्दर्शकाच्या इच्छेनुसार वागून भानू उदयने अफलातून कामगिरी केली आहे, यात शंकाच नाही!

Web Title: Fat to Fit: Journey of Bhanu rising in 'Samastra Penal fine'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.